MS Dhoni CSK New Role pudhari
स्पोर्ट्स

MS Dhoni CSK New Role: धोनीसाठी CSK मधील मोठी पोस्ट खाली होणार... १७ वर्षे सेवा करणाऱ्या दिग्गजाला मिळणार नारळ?

Anirudha Sankpal

MS Dhoni CSK New Role: आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला आपल्या लैकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. चेन्नई सुपर किंग्जला प्ले ऑफ गाठण्यात अपयश आले असून त्यांना ग्रुप स्टेजमधूनच गाशा गुंडाळावा लागत आहे. यंदाच्या हंगामात चेन्नईचा थला एकही सामना खेळला नाही. तो पोटरीच्या दुखापतीतून सावरलाच नाही. हा त्याचा शेवटचा हंगाम ठरतो की काय अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू असतानाच

रविंचंद्रन अश्विनने सोशल मीडियावर एक बॉम्ब टाकला. त्याने महेंद्रसिंह धोनी आता चेन्नई सुपर किंग्जचा हेड कोच होणार असल्याचे संकेत त्याने दिले.

चेन्नईने यंदाच्या हंगामात १४ सामन्यांपैकी फक्त ६ सामने जिंकले आहेत. त्यामुळं आता हेड कोच स्टीफन फ्लेमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याचवेळी फ्लेमिंगने त्याच्या भविष्याबाबत एक मोठे वक्तव्य केलं आहे. त्याने क्रिकेटमध्ये प्रशिक्षकाचे भविष्य हे रिझल्ट निश्चित करत असतात. आता पुढे काय करायचे याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घ्यायचा आहे.

या वक्तव्यानंतर चेन्नईत आता प्रशिक्षक चमूत मोठे बदल होण्याचे संकेत दिसू लागले आहेत. चाहते देखील चेन्नई आता नव्या कोचच्या शोधात असल्याचे बोलू लागले आहे. एका चाहत्याने गंमतीत अश्विनला ही जबाबदारी देऊ नये नाही तर तो आपल्या युट्यूब चॅनलवर आधीच प्लेईंग ११ सांगून टाकेल.

अश्विनने देखील या गंमतीत केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने मी पूर्णपणे तुझ्याशी सहमत आहे मी प्लेईंग ११ नाही तर विरोधी संघाला आमची फलंदाजी आणि गोलंदाजीची पूर्ण प्लॅनिंग देखील सांगून टाकणार.'

अश्विन पुढे म्हणाला की, जर एमएस धोनी आहे तर मग इतर कोणाचा शोध का घ्यावा.' अश्विनने असे वक्तव्य करताच सोशल मीडियावर भविष्यात धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कोच होईल अशी चर्चा सुरू झाली.

जरी धोनी यंदाच्या हंगामात एकही सामना खेळू शकलेला नसला तरी तो सामन्यानंतर संघासोबत सराव सत्रात सहभागी होत होता. धोनीला क्रिकेटचा सर्वात मोठा मास्टर माईंड मानलं जातं. सामन्यात परिस्थिती काय आहे याचे रिडिंग त्याच्यापेक्षा चांगले कोणाचे नाही. दबावात शांत राहून निर्णय घेण्याची त्याची क्षमता वाखाण्याजोगी आहे. एक आदर्श कोच होण्याच्या सर्व गुण त्याच्यात आहेत. सीएसकेचे कल्चर, टीम मॅनेजमेंट आणि खेळाडूंसोबतचे त्याचे बाँडिंग चांगले आहे. त्यामुळं सीएसकेसाठी हा फायद्याचाच निर्णय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT