Mitchell Starc 1st Ashes Test 2025:
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं दमदार गोलंदीज करत इंग्लंडच्या फलंदाजांना चांगलीच धडकी भरवली. मिचेल स्टार्कनं पहिल्या डावात ५८ धावात तब्बल ७ विकेट्स घेतल्या.
याचबरोबर त्यानं ॲशेसच्या इतिहासात आतापर्यंत कोणाला जमला नाही असा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटला भोपळाही न फोडता माघारी धाडलं. स्टार्कने मार्नस लाबुशेनकरवी रूटला झेलबाद केलं. ही त्याची ॲशेसमधील १०० वी विकेट ठरली. अॅशेसमध्ये शंभर विकेट्स घेणारा तो २१ वा गोलंदाज ठरला.
मात्र याचसोबत त्यानं एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला. मिचेल स्टार्क हा ॲशेसमध्ये १०० वी विकेट घेणारा पहिला डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर तो ऑस्ट्रेलियाकडून प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेत विकेट्सचं शतक साजरा करणारा १३ वा फलंदाज ठरला.
ऑस्ट्रेलियाचे दोन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड हे दुखापतग्रस्त आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत स्कॉट बोलँड आणि ब्रँडन डॉगेट यांनी मिचेल स्टार्कला उत्तम साथ दिली.
मिचेल स्टार्ककडे आता वसीम अक्रम याचा देखील विक्रम मोडण्याची संधी आहे. डावखुऱ्या वेगवान गोलंदांकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. त्यानं ४१४ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. ॲशेस मालिका संपेपर्यंत मिचेल स्टार्क सातत्यानं खेळला तर तो हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव १७२ डावात संपुष्टात आला. इंग्लंडकडून हॅरी ब्रुक्सनं सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याला पोपने ३६ तर स्मिथने ३३ धावा करून चांगली साथ दिली.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची देखील दुसऱ्या डावात भंबेरी उडाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ९ बाद १२३ धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅलेक्स कॅरीनं सर्वाधिक २६ धावा केल्या. तर इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सनं ५ तर कार्से आणि जोफ्रा आर्चरनं प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
उस्मान ख्वाजा, जॅक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रेविस हेड, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेट कीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन, ब्रँडन डॉगेट, स्कॉट बोलँड
बेन डकेट, जॅक क्रॉउली, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेट कीपर), गस एटकिंसन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वुड
पहिली कसोटी : 21–25 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी : 4-8 डिसेंबर, गाबा, ब्रिस्बेन (D/N), 9.30 वाजता
तिसरी कसोटी : 17-21 डिसेंबर, एडिलेड ओवल, सकाळी 5 वाजता
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर, मेलबर्न, सकाळी 5 वाजता
पाचवी कसोटी : 4-8 जानेवारी, सिडनी, सकाळी 5 वाजता