Litton Das On BCB: बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमध्ये सध्या चांगलाच संघर्ष सुरू आहे. भारतात काही आठवड्यात सुरू होणाऱ्या टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये बांगलादेश सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळणार नाही म्हणून अडून बसला आहे. त्यांना त्यांचे सर्व सामने श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये शिफ्ट करायचे आहेत. मात्र आयसीसीने याला स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. दरम्यन, बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार लिटन दास याला बांगलादेश प्रीमियर लीगदरम्यान आगामी टी २० वर्ल्डकप संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बांगलादेश प्रीमियर लीगमधील सामन्यावेळी लिटन दासला या स्पर्धेतील खेळपट्ट्यांबाबत आणि त्याचा आगामी टी २० वर्ल्डकपच्या तयारीसाठी मदत होणार का अशा संदर्भातील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी लिटन दासने या स्पर्धेतील समावेशाबाबत अनिश्चितता आहे. त्यांचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार की नाही हेच अजून निश्चित नसल्याचं कर्णधार लिटन दास म्हणाला.
लिटन दासने प्रतिक्रिया देताना प्रतिप्रश्न केला, तो म्हणाला, 'आपण वर्ल्डकप खेळायला जाणार आहोत याबाबत तुम्हाला खात्री आहे का? माझ्या मते अजून अनिश्चिततेचं वातावरण आहे. सर्व काही अनिश्चित आहे. मला वाटतं की संपूर्ण बांगलादेश सध्या अनिश्चित आहे. यावर काहीही उत्तर नाही. तुम्ही कोणता प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत आहात हे मला माहिती आहे. मात्र हे माझ्यासाठी सुरक्षित नाही. त्यामुळं उत्तर देणार नाही.'
यापूर्वी बांगलादेश सरकारमधील क्रीडा सल्लागार असिफ नझरूल यांनी जरी आयसीसीने बीसीबीला अल्टीमेटम दिला असला तरी कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशचा संघ टी २० वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात जाणार नाही असं सांगितलं. दरम्यान, आज २१ जानेवारी बीसीबीला आयसीसीने अल्टीमेटम दिला आहे.
जर बीसीबी आपल्या भूमिकेवर अजून ठाम राहिलं आणि भारतात खेळण्यास नकार दिला तर आयसीसी रँकिंगच्या बेसिसवर बांगलादेशऐवजी स्कॉटलँडची निवड करण्याची शक्यता आहे.
याबाबत नझरूल यांनी पत्रकरांना सांगितलं की, 'स्कॉटलँडच्या प्रवेशाबाबत मला काही माहिती नाही. जर आयसीसी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या दबावाखाली आलं तर ते आपल्यावर अनेक अटी लादू शकतात. आम्हाला त्या अटी मान्य नाहीत.