ढाका : बांगला देशातील हिंसाचारावेळी (Bangladesh Protest) हिंदू मंदिरांची विटंबना करण्याच्या घटना घडल्या. यावेळी आंदोलकांनी हिंदूंच्या सांस्कृतिक स्थळांचीही तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.
काही ठिकाणी हिंदूच्या घरांना आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. हसीना यांचे वडील मुजीबर रेहमान यांच्या स्मारकाची तोडफोड केली. आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यामुळे हिंदूंसह अन्य अल्पसंख्याक समुदायात भीतीचे वातावरण पसरले आहे. भारत- बांगला देशातील सांस्कृतिक संबंधांना बाधा आणण्यासाठीच हिंदूंना टार्गेट केला जात असल्याची माहिती हिंदू समुदायातील सूत्रांनी दिली. (Bangladesh Protest)
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ढाक्याच्या शहीद मिनारजवळ २० लाख लोक जमले होते. चोहीकडे फक्त माणसे आणि माणसेच होती. शेख हसिना देश सोडून गेल्याचे कळाल्यावर तेथे एकच जल्लोष झााला. पण, थोड्याच वेळात या जल्लोषाचे रूपांतर गोंधळात झाले. हा गोंधळ इतका वाढला की, शेवटी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांना गोळीबार करावा लागला, त्यात अनेक जण जखमी झाले अशी माहिती ढाक्यात असलेल्या इचलकरंजीच्या शहानवाज हुसेन या तरुणाने दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शहानवाज हुसेन याने ढाक्यात नेमके सोमवारी काय घडले याची माहिती दिली.