Lionel Messi Farewell Match pudhari
स्पोर्ट्स

Lionel Messi Farewell Match: फेअरवेल मॅचवरून वाद... मेस्सीचा खेळण्यास नकार; खरंच निरोप देताय की पैसे कमवताय?

सामन्याचे आयोजन करण्याचा उद्देश हा मला फेअरवेल देणं आहे का की पैसा कमवणं हा आहे

Anirudha Sankpal

Lionel Mess Farewell Match: अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाकडून आपला शेवटचा सामना खेळणार आहे. भारतीय प्रमाणवेळे नुसार बुधवारी पहाटे ४.३० वाजता हा सामना सुरू होणार आहे. मेस्सीचा हा कारकिर्दीतील २०८ वा सामना असणार आहे. मेस्सीने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती.

मात्र मेस्सीला हा फेअरवेल सामना खेळण्यास मनवण्यात आलं आहे. मिळालेल्या एका माहितीनुसार मेस्सी हा सामना खेळणार नव्हता. त्याने आयोजकांना या सामन्याचे आयोजन करण्याचा उद्देश हा मला फेअरवेल देणं आहे का की पैसा कमवणं हा आहे असा सवाल केला होता.

मेस्सी नाराज

मेस्सी जवळपास दोन दशके अर्जेंटिनाकडून खेळला. त्याने २०८ वा सामना खेळून आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मेस्सीचा शेवटचा सामना सहाजिकच मोठा होणार होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आयोजकांच्या लालचीपणावर मेस्सी खूप नाराज आहे.

वर्ल्डकप फायनल हरल्यानंतर निवृत्ती

फिफा वर्ल्डकप २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनकडून अर्जेंटिनाचा पराभव झाला होता. त्यानंतर ३९ वर्षाच्या मेस्सीने तो अपेक्षापूर्ती करू शकला नाही असं मान्य केलं होतं. त्यामुळं त्याचा संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्डचॅम्पियन बनू शकला नाही.

त्यानंतर मेस्सीने निवृत्ती जाहीर केली होती. तो डोळ्यात अश्रू घेऊन मैदानातून बाहेर पडला होता. मेस्सीचे वडील देखील वारले. त्यानंतर मेस्सीने अर्जेंटिनाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला. त्याचे वडील त्याची मोठी ताकद होते.

पैशावरून वाद?

मेस्सीने निवृत्तीनंतरच्या फेअरवेल सामन्याबद्दल सुरूवातीलाच सांगितलं होतं की माझ्या निरोपाच्या सामन्यातून पैसे कमवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं तो हा सामना खेळण्यात तयार नव्हता. मात्र नंतर तो सामना खेळण्यास तयार झाला. मेस्सी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना बेनिनविरूद्ध खेळणार आहे. बेनिन संघाची या सामन्यासाठी निवड करण्यात आली कारण तो संघच पैसे न घेता हा सामना खेळण्यास तयार होता.

बेनिनचे खेळाडू फक्त अर्जेटिना अन् मेस्सीसोबत फोटोत असणार या गोष्टीनेच खुश आहेत. मेस्सीच्या शेवटच्या सामन्यात जवळपास ८५ हजार प्रेक्षक येण्याची शक्यता आहे. अशावेळी विरोधी संघाला पैसे न देण्याचा निर्णय आश्चर्यकारक आहे. दिग्गज खेळाडूच्या निरोपाच्या सामन्याची गरिमा यामुळं कमी होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT