Kylian Mbappe FIFA World Cup 2026 records: फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पेने फिफा वर्ल्डकप २०२६ मध्ये इतिहास पुन्हा बदलला. चित्याच्या वेगानं मैदानात धावणाऱ्या रियल माद्रिदकडून खेळणाऱ्या एम्बाप्पेने फ्रान्सला धमाकेदार विजय मिळवून दिला. राऊंड ऑफ ३२ मध्ये फ्रान्सने स्विडनचा ३-० असा धुव्वा उडवला. यात एम्बाप्पेचा दोन धडाकेबाज गोलचा समावेश होता.
या दोन गोलच्या जोरावरच एम्बाप्पेने जर्मनीचा स्टार माजी खेळाडू मिरोस्लाव्ह क्लोसे यांचा विक्रम देखील मागे टाकले. आता किलियन एम्बाप्पे हा फिफा वर्ल्डकपच्या इतिहासातील नॉकाऊट्समध्ये सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या फिफा वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत १८ गोल झाल्या आहेत. विशेष म्हणजे एम्बाप्पेची महानता ही त्याने नॉक आऊटमध्ये मारलेल्या १० गोलवरून दिसून येते. या बाबतीत रोनाल्डो आणि मेस्सी देखील आसपास नाहीत.
एम्बाप्पेने ब्राझिलच्या रोनाल्डो नाझरिओ आणि लिओनिदास यांच्या नॉकआऊटमधील प्रत्येकी ८ गोल्सचा विक्रम आज मागे टाकला.
लिओनेल मेस्सी हा फिफा वर्ल्डकप इतिहासात सर्वाधिक गोल करण्याऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने १९ गोल मारले आहेत. मात्र त्याने नॉकाऊटमध्ये फक्त ५ गोल मारले असून एम्बाप्पे हा या बाबतीत मेस्सीच्या खूप पुढे आहे. विशेष म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर फिफा नॉकाऊटमध्ये एकही गोल नाहीये.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर फ्रान्सच्या एम्बाप्पेने स्विडनच्या डिफेन्सचा धुव्वा उडवला. फ्रान्सच्या मायकले ओलिसे याने सामन्यात तीन गोलमध्ये असिस्ट करण्याची हॅट-ट्रिक साधली. त्यातील दोनवेळा एम्बाप्पेला बॉटम राईट कॉर्नर मिळाला. त्यानंतर त्याने आपला ट्रेडमार्क वेग आणि फिनिशिंगच्या जोरावर दोन गोल केले.
दरम्यान, सामना झाल्यावर फ्रान्सचे मॅनेजर दिदीअर यांनी सांगितलं की, 'सामन्यापूर्वी किलियन रेकॉर्ड्सकडे पाहत नाही. तो जागा शोधत असतो. मात्र त्याची जागतिक स्तरावर सातत्यानं कामगिरी करण्याची क्षमता त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते.'