स्पोर्ट्स

IPL Controversy | 'आयपीएल'मुळे माझे क्रिकेट करीअर संपले : इंग्लंडचा माजी कर्णधाराचा गौप्यस्फोट

IPL Controversy | लीगमध्‍ये खेळण्‍यास प्राधान्य देण्याच्या निर्णयामुळे ECB सोबत संबंध बनले अत्यंत तणावपूर्ण

पुढारी वृत्तसेवा

Kevin Pietersen IPL controversy

नवी दिल्‍ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील सहभागावरून 'इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड' (ECB) बरोबर झालेल्या वादामुळे आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली, अशी खळबळजनक आरोप इंग्‍लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसने केला आहे.

माझ्‍या विरोधात ECBने प्रसारमाध्यमांचा वापर करत पद्धतशीर 'मोहीम' राबवली

यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत पीटरसनने आरोप केला की, IPL च्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये 'इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड' (ECB) ने प्रसारमाध्यमांचा वापर करून त्याच्या विरोधात एक पद्धतशीर 'मोहीम' (witch-hunt) चालवली होती. २००८ मध्ये झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात, ECB ने केंद्रीय करारावर असलेल्या खेळाडूंना सहभागी होण्यास मनाई केली होती; त्या वर्षी सहभागी होणारा दिमित्री मस्कारेनहास हा एकमेव इंग्लिश खेळाडू होता.

लीगला प्राधान्य देण्याच्या निर्णयामुळे ECB सोबत संबंध बनले तणावपूर्ण

२००९ मध्ये, इंग्लंडने खेळाडूंना केवळ तीन आठवड्यांच्या मर्यादित कालावधीसाठी स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली. २००९ मध्ये पीटरसन 'रॉयल ​​चॅलेंजर्स बंगलोर' (आताचे बेंगळुरू) संघात सामील झाला आणि या लीगला प्राधान्य देण्याच्या त्याच्या निर्णयामुळे ECB सोबत त्याचे संबंध अत्यंत तणावपूर्ण बनले, असा आरोप केला जातो.

मी मोठे त्याग केले. माझी कारकीर्द गमावली

"मी मोठे त्याग केले. माझी कारकीर्द गमावली. म्हणूनच त्या प्रशासकीय व्यवस्थेतील प्रत्येकजण माझ्या विरोधात गेला. माझी इंग्लंडमधील क्रिकेट कारकीर्द संपली. त्‍यावेळी मी ३३ वर्षांचा होतो आणि १०४ कसोटी सामने खेळलो होतो. मी १५०-१६० कसोटी सामने खेळायला हवे होते, १२,०००-१३,००० धावा करायला हव्या होत्या. हेच मी साध्य करायला हवे होते, असेही पीटरसनने नमूद केले.

मला लक्ष्‍य करण्‍यासाठी 'द टेलिग्राफ'चा वापर

"ECB ने माझ्यावर टीका करण्यासाठी आणि मला लक्ष्य करण्यासाठी 'द टेलिग्राफ' या वृत्तपत्राचा वापर केला... मला आता या विषयाच्या फार खोलात जायचे नाही. ही बाब त्यावेळी खूप गाजली होती, पण आता मी खूप आनंदी आणि शांततापूर्ण आयुष्य जगत आहे," असेही पीटरसनने नमूद केले.

माझ्‍या भूमिकेमुळेच इंग्‍लंडच्‍या खेळाडूंना मिळाले स्वातंत्र्य

पीटरसनने कसोटी कारकीर्द ८,१८१ धावा केल्‍या. यामध्ये २३ शतके आणि ३५ अर्धशतकांचा समावेश होता. मी २००९ मध्‍ये घेतलेल्‍या भूमिकेमुळेच इंग्लंडच्या भविष्यातील खेळाडूंना 'फ्रँचायझी क्रिकेट'मध्ये सहभागी होण्याचे स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली. काही दिवसांपूर्वीच मी जॉस बटलरची मुलाखत घेतली होती आणि त्यानेही मला 'धन्यवाद' म्हटले. मी केलेल्या त्यागांमुळेच, आजच्या पिढीतील हे खेळाडू त्या स्वातंत्र्याचा आणि यशाचा आनंद घेऊ शकत आहेत," असेही त्‍यानंे नमूद केले. पीटरसनने IPL मध्ये 'दिल्ली डेअरडेव्हिल्स' आणि 'सनरायझर्स हैदराबाद' या संघांकडूनही सामने खेळले. २०२५ मध्ये त्याची दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT