Kavya Maran SRH Team Selection pudhari
स्पोर्ट्स

Kavya Maran SRH Team Selection: मालकांना तो खेळाडू आवडायचा.... काव्या मारनचा संघनिवडीत हस्तक्षेप? परदेशी खेळाडूचा दावा

Anirudha Sankpal

Kavya Maran SRH Team Selection: आयपीएलमध्ये संघ मालक संघ निवडीत हस्तक्षेप करतात का हा एक महत्वाचा मुद्दा कायम चर्चेत असतो. मात्र संघ मालक असं करतात याचा काही ठोस पुरावा आतापर्यंत तरी समोर आले नाही. जे मालक शेकडो कोटी रूपये प्रत्येक वर्षी ओतत असतात. ते खेळाविषयी खूप पॅशिनेट असतात. ते आपल्या संघाला स्टेडियममध्ये येऊन सपोर्ट करत असतात. मात्र ते त्यांची मर्यादा सोडतात का, ते संघ निवडीत हस्तक्षेप करतात का हा सर्वसामान्यांसाठी एक चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न असतो.

हैदराबाद संघात चाललंय काय?

नुकतेच सनराईजर्स हैदराबादचा स्टार खेळाडू लिम लिव्हिंगस्टोन याने आयपीएल २०२६ चे एक उदाहरण दिलं अन् सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूने यंदाच्या हंगामात फक्त २ सामने खेळले आहेत. त्यात त्याने एका सामन्यात १ तर दुसऱ्या सामन्यात १४ धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने त्याच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूला का खेळवलं तर मालकाला तो खेळाडू आवडत होता असा धक्कादायक खुलासा केला. याचबरोबर लिव्हिंगस्टोनने हैदराबाद सातत्याने फक्त तीन परदेशी खेळाडू का खेळवत होते याचे देखील कारण सांगितलं आहे.

लिव्हिंगस्टोनने स्वतःचेच दिले उदाहरण

एका पॉडकास्टमध्ये लिव्हिंगस्टोन म्हणाला की, 'मला वाटतं की तीन प्रकारची आयपीएल असते. एकात तुमची काळजी घेतली जाते सर्व काही तुमच्यासाठी सेट केलं जातं. दुसऱ्या प्रकारात तुम्ही खेळू शकता किंवा खेळू शकत नाही. त्यावेळी तुमच्या मनात जर मी खेळेन त्यावेळी अशा गोष्टी करणार. तिसरा प्रकार म्हणजे माझे उदाहरण...'

'या वर्षी मी ज्यावेळी तिथं गेलो त्यावेळी हैदराबादने एका खेळाडू सलील अरोरा याला लिलावात खरेदी केलं होतं. मुंबई इंडियन्स त्याला घेऊ इच्छित होते. मात्र आमच्याकडे जास्त पैसे होते म्हणून आम्ही त्याला आमच्या गोटात खेचलं. मालकाचा तो आवडता खेळाडू होता. त्यामुळं तो प्लेईंग ११ मध्ये देखील आला. ज्यावेळी पॅट कमिन्स नव्हता त्यावेळी देखील आम्ही तीनच परदेशी प्लेईंग ११ मध्ये खेळवत होतो. मी याबाबत डॅनियल व्हिटोरीला विचारलं फक्त तीनच परदेशी खेळाडू का?'

खूप पैसा... कूकचा टोला

त्यावर डॅनियल म्हणाला की, मालकाला तो खेळाडू खूप आवडतो. ज्यावेळी कमिन्स संघात आला त्यावेळी देखील आम्ही कोणत्याही गोष्टी बदलल्या नाहीत. मात्र हे चांगलं होतं कारण मला माहिती होतं की जर कोणी दुखापतग्रस्त झालं नाही तर मला काय खेळायची संधी मिळणार नाही. त्यामुळं ज्यावेळी तुम्ही खेळणार नाही हे तुम्हाला माहिती असतं त्यावेळी तुमची मानसिकता वेगळी असते.'

लिव्हिंगस्टोनने हा धक्कादायक खुसाला केल्यानंतर डेव्हिड लॉईड यांनी एक खोचक प्रश्न विचारला. या मालकांकडे असे कोणते विशेष प्राविण्य आहे? त्यावेळी शेजारी बसलेला एलास्टर कूकने 'खूप पैसा' असा टोमणा मारला.

लिव्हिंगस्टोनची सारवासारव

त्यावर सारवासारव करत लिव्हिंगस्टोन म्हणाला की, 'मला माहिती नाही की त्यांनी हा निर्णय घेतला होता की नाही. मात्र हे नक्की आहे की संघनिवडीत ते त्यांचे म्हणणे मांडतात. मात्र माझ्या दृष्टीने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या वर्षी डॅनिलय व्हिटोरीने मला काय घडतंय हे सर्व सांगितलं होतं. त्यामुळं मला याची सर्व कल्पना होती.'

काव्या मारनचा हैदराबादचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये पोहचला होता. मात्र राजस्थान रॉयल्सकडून त्यांना इलिमिनेटरमध्ये पराभव स्विकारावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT