Jasprit Bumrah T20 World Cup 2026 Pudhari
स्पोर्ट्स

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा धक्का! हर्षित राणानंतर जसप्रीत बुमराही संघाच्या बाहेर; काय आहे कारण?

Jasprit Bumrah Miss Ind vs USA Match: जसप्रीत बुमरा आजारी असल्यामुळे ICC Men's T20 World Cup 2026 मधील भारताच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाहीत. अमेरिकेविरुद्धच्या लढतीत मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे.

Rahul Shelke

Jasprit Bumrah Miss Ind vs USA Match: टी-20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि अमेरिका यांच्यात पहिला सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजारी असल्यामुळे पहिल्या सामन्यात तो खेळणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार बुमराहला ताप आला आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. काल तो संघासोबत वानखेडे स्टेडियमवर आला होता, मात्र त्याने मैदानावर सराव केला नाही.

दरम्यान, वॉशिंग्टन सुंदर पण दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. तो सध्या बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपचार घेत आहे. त्यामुळे भारतीय संघाकडे प्लेइंग इलेव्हनसाठी मर्यादित पर्याय उरले आहेत.

बुमराह न खेळल्यास मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता आहे. सिराजचा संघात समावेश शुक्रवारीच करण्यात आला आहे. कारण सराव सामन्यात गुडघ्याला दुखापत झाल्याने हर्षित राणा स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

इशान किशन करणार सुरुवात

फलंदाजीबाबत बोलायचं झालं तर इशान किशन आणि अभिषेक शर्मा सामन्याची सुरुवात करतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात इशान किशनने सलामीला फलंदाजी करुन 53 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध तिरुवनंतपुरम येथे झालेल्या सामन्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकावलं होतं. संजू सॅमसन सध्या फारसा फॉर्ममध्ये नसल्यामुळे संघ व्यवस्थापनाला इशान किशनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

पहिल्याच सामन्यात बुमराह बाहेर गेल्यामुळे भारतीय गोलंदाजीवर दबाव येणार आहे. आता सर्वांचे लक्ष संघाच्या अमेरिकेविरुद्धच्या कामगिरीवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT