Ishan Kishan To Marry Aditi Hundia file photo
स्पोर्ट्स

Ishan Kishan: ईशान किशनचे लग्न कधी? आईने स्पष्टच सांगितलं! गर्लफ्रेंड अदिती हुंडियाबद्दल काय म्हणाली?

Ishan Kishan To Marry Aditi Hundia: मॉडेल अदिती हुंडिया आणि ईशानच्या नात्यावर त्याच्या आजोबांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. त्यातचा आता ईशानच्या आईने त्यांच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

मोहन कारंडे

Ishan Kishan T20 World Cup

नवी दिल्ली: टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध ७७ धावांची तुफानी खेळी करून ईशान किशनने भारताला विजय मिळवून दिला. ईशानच्या या खेळीने चाहत्यांची मने जिंकली असून त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याची गर्लफ्रेंडही सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मॉडेल अदिती हुंडिया आणि ईशानच्या नात्यावर त्याच्या आजोबांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्या लग्नाच्या अफवांना उधाण आले होते. मात्र, ईशानची आई सुचित्रा देवी यांनी या अफवा फेटाळून लावल्या असून, सध्या त्याने खेळावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ असल्याचे म्हटले आहे.

आई सुचित्रा देवी काय म्हणाल्या?

IANS शी बोलताना त्या म्हणाल्या की, "विषय लग्नाचा नाही, आता त्याच्यासाठी क्रिकेट खेळण्याची वेळ आहे. त्याचे वय अजून लग्नाचे नाही. आजोबांचे वय झाले आहे, त्यामुळे वृद्ध माणसे नेहमीच थोडी उत्साहात असतात. सोशल मीडियावर काही ना काही येत असते आणि त्यांनी तिथे जे पाहिले त्या आधारावरच ते बोलले असावेत."

वडील काय म्हणाले?

ईशानचे वडील प्रणव पांडे यांनी देखील माध्यमांना सांगितले की, आम्ही बहुतेकदा आमच्या मुलाशी घरगुती बाबींवर चर्चा करतो. तो चांगला खेळत आहे. संपूर्ण कुटुंबाला त्याला पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना पाहून अभिमान वाटला. भारताच्या विजयात ईशानच्या भूमिकेपेक्षा आम्हाला आनंद होऊ शकत नाही. जयपूरच्या एका मॉडेलशी त्याच्या लग्नाबद्दलच्या प्रश्नाबाबत प्रणव म्हणाले की, ईशानचे आजोबा राम अनुग्रह पांडे हे एक साधे व्यक्ती आहेत. सध्या, ईशान आणि त्याच्या कुटुंबाच लक्ष खेळावरच आहे. तो कठोर परिश्रम करून संघात परतला आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पहल्यांदा टी-२० विश्वचषक देशात यायला हवा, त्यानंतर आपण लग्नाबद्दल बोलू.

आजोबांनी काय म्हटले होते?

ईशानच्या आजोबांनी ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होते की, "ईशानला ज्याच्याशी लग्न करायचे आहे, त्याला आमची पूर्ण संमती आहे. अदिती त्याची गर्लफ्रेंड आहे आणि ती एक मॉडेल आहे. ज्या गोष्टीत मुले आनंदी असतात, ती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे." आजोबांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

भारतीय संघाची सद्यस्थिती

भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव करून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधील आपला शेवटचा सामना भारतीय संघ आज (दि. १८) अहमदाबाद येथे नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT