CSK चा फलंदाज शिवम दुबे तुफान फटकेबाजी करत असताना, स्टँड्समध्ये बसलेला एक चाहता 'लिंबू' (Lemon Trick) वापरून काहीतरी करताना कॅमेऱ्यात कैद झाला.  Pudhari.
स्पोर्ट्स

IPL Black Magic Controversy | IPL मध्ये 'काळी जादू'? जुन्‍या आठवणींना उजाळा देत ललित मोदींनी केला धक्‍कादायक दावा

SRH vs CSK सामन्यानंतर व्‍हायरल झालेल्‍या 'त्या' पत्रामागचं सत्य आलं समोर!

पुढारी वृत्तसेवा

IPL Black Magic Controversy

यंदाच्या IPL हंगामात एकीकडे मैदानातील चौकार-षटकारांची आतषबाजी होत असतानाच एका वेगळ्याच वादाने तोंड वर काढले आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्यादरम्यान 'काळ्या जादू'चा वापर झाल्याचा खळबळजनक दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला. या वादात आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी उडी घेतली असून त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर 'काळ्या जादू'च्या चर्चेला ऊत का आला?

१९ एप्रिल रोजी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना झाला. १९५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात वादळी झाली होती. पण सामना फिरला तो एका विचित्र घटनेने! CSK चा फलंदाज शिवम दुबे तुफान फटकेबाजी करत असताना, स्टँड्समध्ये बसलेला एक चाहता 'लिंबू' (Lemon Trick) वापरून काहीतरी करताना कॅमेऱ्यात कैद झाला. योगायोग असा की, त्यानंतर लगेचच पुढच्या चेंडूवर शिवम दुबे झेलबाद झाला. येथूनच चेन्नईची पकड सुटली आणि सोशल मीडियावर 'काळ्या जादू'च्या चर्चेला ऊत आला.

आयपीएलमध्ये यापूर्वी असे प्रकार खरोखर घडले आहेत : ललित मोदी

या प्रकरणावर भाष्य करताना आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ललित मोदींच्या मते, सध्या व्हायरल होत असलेले पत्र जरी बनावट असले, तरी आयपीएलमध्ये यापूर्वी असे प्रकार खरोखर घडले आहेत.

२०११ मध्ये एका संघ मालकाने केली होती 'अघोरी' कृती

"२०११ च्या आयपीएल हंगामात एका संघ मालकाने प्रतिस्पर्धी संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन अशा प्रकारची 'अघोरी' कृती केली होती. मला जेव्हा याचे ठोस पुरावे मिळाले, तेव्हा मी दुसऱ्या संघाच्या मालकांना सावध देखील केले होते. लवकरच एका चित्रपट किंवा वेबसीरीजच्या माध्यमातून मी त्या संघ मालकाचे नाव पुराव्यासह जाहीर करेन, असा दावाही ललित मोदी यांनी आपल्‍या सोशल मीडिया पोस्‍टमध्‍ये केला आहे.

SRH vs CSK सामन्यात काय घडलं?

१९५ धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्येच चेन्नईने ७६ धावा केल्या होत्या. मात्र शिवम दुबे बाद झाला आणि हैदराबादच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. शेवटच्या षटकात १८ धावांची गरज असताना गोलंदाज प्रफुल्ल हिंगेने नो-बॉल टाकूनही स्वतःला सावरले आणि अचूक मारा करत चेन्नईला १८४ धावांवर रोखले. हैदराबादने हा सामना १० धावांनी जिंकला असला, तरी आता विजय खेळाचा झाला की 'जादूचा', यावर सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. अद्याप आयपीएल प्रशासन किंवा कोणत्याही संघाने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT