स्पोर्ट्स

IPL 2025 Sai Sudharsan Records : सर्व सामन्यांत पन्नासहून अधिक सरासरी असलेला साई सुदर्शन एकमेव खेळाडू

गुजरात, पंजाब आणि बेंगळुरू तिन्ही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या साई सुदर्शनने एक ऐतिहासिक कामगिरी केली.

रणजित गायकवाड

IPL 2025 Sai Sudarshan only player to average over fifty in all matches

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने रविवारी दिल्ली कॅपिटल्सचा 10 गडी राखून पराभव केला. के. एल. राहुलच्या दमदार शतकाच्या (नाबाद 112) जोरावर दिल्लीने 199 धावांची मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या साई सुदर्शनने 61 चेंडूंत नाबाद 108 धावा ठोकल्या. कर्णधार शुभमन गिलदेखील 93 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे एकही गडी न गमावता गुजरातने सामना जिंकला.

या विजयासह गुजरात, पंजाब आणि बेंगळुरू तिन्ही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरले. गुजरातच्या विजयाचा शिल्पकार असलेल्या साई सुदर्शनने एक ऐतिहासिक कामगिरी केली.

आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत तब्बल 1200 हून जास्त खेळाडू खेळले आहेत, पण साई सुदर्शनने आपली श्रेष्ठता सिद्ध केली आहे. आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीत साईने 37 सामन्यांच्या 37 डावांत 50.03 च्या सरासरीने 1651 धावा केल्या आहेत.

साई सुदर्शन हा आयपीएल कारकिर्दीत 50 किंवा त्याहून अधिक सरासरी असलेला एकमेव खेळाडू आहे. त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणार्‍या साई सुदर्शनवर गेल्या वर्षी 10 डिसेंबर 2024 रोजी शस्त्रक्रिया झाली होती. त्या शस्त्रक्रियेतून बरा झाल्यानंतर, त्याने पुनरागमन केले आणि दमदार ‘कमबॅक’ केले.

साई सुदर्शन गुजरात टायटन्समधील अतिशय उपयुक्त फलंदाज ठरताना दिसत आहे. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही आघाडीवर आहे. त्याने 12 डावांमध्ये 56.09 च्या सरासरीने 617 धावा केल्या आहेत. या हंगामात सध्या तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

साई सुदर्शनला ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोणाकडूनही स्पर्धा असेल तर तो शुभमन गिल आहे, ज्याने या हंगामात 12 डावांत 60.10 च्या सरासरीने 601 धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT