स्पोर्ट्स

Mumbai Indians Top 2 Scenario : मुंबईचं टॉप-2 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न अधांतरी? 'या' 2 संघांचा मोठा अडथळा, जाणून घ्या समीकरण

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव केल्यानंतर, Mumbai Indians संघ प्लेऑफसाठी पात्र झाला. सूर्यकुमार यादव आतापर्यंत संघासाठी सर्वात मोठा हिरो ठरला आहे.

रणजित गायकवाड

Mumbai Indians Top 2 scenario IPL 2025

आयपीएल 2025 आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. स्पर्धेच्या प्लेऑफसाठी सर्व चारही संघ निश्चित झाले आहेत. गुजरात टायटन्स, आरसीबी, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. सध्या, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईला अजूनही पॉइंट्स टेबलमध्ये टॉप-2 मध्ये प्रवेश मिळवण्याची संधी आहे.

MI चा एकच सामना शिल्लक

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकूण 13 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी 8 जिंकले असून 5 गमावले आहेत. यासह एमआयच्या खात्यात 16 गुण जमा झाले आहेत. त्यांचा नेट रन रेट सर्वाधिक 1.292 आहे. पण गुण कमी असल्याने हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. चालू हंगामात मुंबईचा अजूनही एक सामना शिल्लक आहे. ते 26 मे रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध मैदानात उतरतील. दरम्यान, टॉप-2 मध्ये पोहोचण्यासाठी, मुंबईला पंजाब किंग्ज विरुद्धचा हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. जर पंड्याच्या संघाची विजयी मोहिम कायम राहिली तर त्यांच्या खात्यात 18 गुण जमा होती.

पण या दरम्यान, एमआयला आरसीबी आणि पंजाब किंग्जने त्यांचे उर्वरित सामने गमावावेत अशी प्रार्थना करावी लागेल. या दोन्ही संघांचे दोन-दोन सामने शिल्लक आहेत. आरसीबी आणि पंजाब किंग्जचे सध्या प्रत्येकी 17 गुण आहेत. अशा परिस्थितीत, जर या दोन्ही संघांचा उर्वरित सामन्यांमध्ये पराभव झाला तर त्यांच्याचे 17 गुणच राहतील आणि मुंबई 18 गुणांसह त्यांच्या पुढे असेल. सध्या, आरसीबी आणि पंजाब किंग्ज संघ मुंबईला टॉप-2 मध्ये पोहोचण्याच्या मार्गात अडथळा बनले आहेत.

मुंबई इंडियन्सची 11व्यांदा IPL प्लेऑफमध्ये धडक

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर जबरदस्त कमबॅक केले. एमआयला पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला. यानंतर, मुंबईने पुनरागमन केले आणि सलग 6 सामने जिंकून विरोधी संघांना इशारा दिला. मुंबईने एकूण 11 व्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. याआधी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT