स्पोर्ट्स

Singer Parashar Joshi IPL Umpire : इंडियन आयडॉलचा गायक गाजवतोय IPLचे मैदान! CSKच्या सामन्यातील ‘पराशर’च्या पंचगिरीची जोरदार चर्चा

आयपीएल 2025मध्ये एक पंच चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. खरंतर, हा पंच 2008 मध्ये इंडियन आयडल सारख्या मोठ्या टीव्ही रिॲलिटी शोमध्ये गायक म्हणून दिसला होता.

रणजित गायकवाड

indian idol singer parashar joshi umpiring in ipl 2025

मुंबई : आयपीएल 2025 आता प्लेऑफकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत लीग टप्प्यात 55 सामने खेळले गेले आहेत. स्पर्धेची फायनल 25 मे रोजी रंगणार आहे. दरम्यान, या यंदाच्या लीगमध्ये एक खेळाडूंसह एक पंच सगळ्यांचे लक्षवेधून घेत आहे. आयपीएलसाठी पहिल्यांदाच निवड झालेल्या सात नवीन पंचांमध्ये त्याचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पंचाने आधीच गायक म्हणून खूप प्रसिद्धी मिळवली आहे आणि इंडियन आयडल सारख्या मोठ्या टीव्ही रिॲलिटी शोमध्ये आपली छाप सोडली आहे. जेव्हा आयपीएलची नुकतीच सुरुवात झाली होती तेव्हा हा पंच संगीत विश्वात आपली ओळख निर्माण करत होता. आता 17 वर्षांनंतर तो आयपीएलचा भाग बनला आहे.

पुण्याचा रहिवासी पराशर जोशी याने आपल्या अनोख्या प्रवासाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 2008 मध्ये इंडियन आयडॉलच्या चौथ्या पर्वात गायक म्हणून सहभागी झालेला पराशर आता आयपीएल 2025 मध्ये पंच म्हणून चमकत आहे. त्याने 5 एप्रिल 2025 रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यातून आयपीएल पंच म्हणून पदार्पण केले.

पराशरने पुण्यातील क्लब क्रिकेटमध्ये खेळताना संगीताची आवड जोपासली. या दोन्ही क्षेत्रांत त्याने नाव कमावले. 2015 मध्ये बीसीसीआयच्या पंचांच्या पॅनेलमध्ये त्याची निवड झाली आणि त्याने रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि 2024 च्या वुमन्स प्रीमियर लीगमध्येही पंचगिरी केली. आयपीएल 2025 साठी बीसीसीआयने सात नवीन पंचांना संधी दिली, त्यापैकी पराशर एक आहे.

त्याने आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी, 24 लिस्ट-ए आणि 30 टी-20 सामन्यांमध्ये फील्ड पंच म्हणून भूमिका बजावली आहे. याशिवाय, तो 1 प्रथम श्रेणी, 1 लिस्ट-ए आणि 3 टी-20 सामन्यांमध्ये टीव्ही पंच म्हणूनही काम करत आहे.

त्याने आतापर्यंत 9 प्रथम श्रेणी, 24 लिस्ट-ए आणि 30 टी-20 सामन्यांमध्ये फील्ड पंच म्हणून भूमिका बजावली आहे. याशिवाय, तो 1 प्रथम श्रेणी, 1 लिस्ट-ए आणि 3 टी-20 सामन्यांमध्ये टीव्ही पंच म्हणूनही काम करत आहे.

सोशल मीडियावर पाराशरची भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरशी असलेली साम्यता देखील चर्चेचा विषय ठरली आहे. त्याच्या हा अनोखा प्रवास संगीत आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परशरला बाईकिंगचीही आवड आहे. त्याचे सोशल मीडिया अकाउंट्स हे त्याच्या संगीताचे व्हिडिओ आणि बाईकिंगच्या प्रवासांनी भरलेले आहेत. त्याचे स्पॉटिफायवर 13,000 श्रोते असून ते 48 देशांमध्ये त्यांचे संगीत ऐकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT