IPL 2025 Final trophy pudhari
स्पोर्ट्स

IPL 2025 Final | 3 जूनला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला किंवा सामना रद्द झाला तर काय? कसा ठरणार विजेता?

IPL 2025 Final | RCB आणि PBKS यांनी अद्याप एकदाही विजेतेपद जिंकलेले नाही

पुढारी वृत्तसेवा

IPL 2025 Final

अहमदाबाद : आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. मात्र, आयपीएलच्या एका विशेष नियमानुसार, हा सामना 4 जून रोजीही खेळवला जाऊ शकतो. त्यामुळे चाहत्यांच्या मनात आता एकच प्रश्न – "IPL Final खरंच 3 जूनला होईल का?"

अंतिम सामना लांबू शकतो ‘या’ कारणामुळे

IPL च्या नियमानुसार, प्लेऑफ आणि फायनल सामन्यांसाठी रिझर्व डे म्हणजेच राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जर 3 जून रोजी पावसामुळे किंवा कोणत्याही अन्य कारणामुळे सामना रद्द झाला, तर अंतिम सामना दुसऱ्या दिवशी – 4 जून रोजी खेळवला जाईल.

नवा नियम: 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ

यंदा आयपीएलने प्लेऑफसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार, जर सामना वेळेत सुरू होऊ शकला नाही, तर 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येईल.

म्हणजेच सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू न होता रात्री 9:30 वाजेपर्यंत उशिरा झाला, तरीही सामन्यात कोणतीही षटक कपात केली जाणार नाही. पूर्ण 20 षटकांचेच खेळ होईल.

अंतिम सामन्यात RCB विरोधात कोण?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने क्वालिफायर-1 मध्ये पंजाब किंग्सवर मात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दुसरी फायनलिस्ट टीम 1 जून रोजी होणाऱ्या क्वालिफायर-2 सामन्यानंतर समोर येईल. मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात हा सामना होणार आहे.

कोणता संघ किती वेळा झाला आहे चॅम्पियन?

सध्या अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या तीन संघांपैकी RCB आणि PBKS या दोन्ही संघानी यापुर्वी कधीच आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.

त्यांनी शेवटचा खिताब 2020 मध्ये जिंकला होता. तेव्हा त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला हरवले होते. त्यानंतर मागील चार हंगामात मुंबई अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलेली नाही.

सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद मिळवणारे संघ:

मुंबई इंडियन्स (2013, 2015, 2017, 2019, 2020)

चेन्नई सुपर किंग्ज (2010, 2011, 2018, 2021, 2023)

आत्तापर्यंतचे विजेते

  • 2024: कोलकाता नाइट रायडर्स (KKR) – सनरायझर्स हैदराबादला 8 गडी राखून हरवले.

  • 2023: चेन्नई सुपर किंग्ज (CSK) – गुजरात टायटन्सला 5 गडी राखून हरवले.

  • 2022: गुजरात टायटन्स – राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून हरवले.

  • 2021: चेन्नई सुपर किंग्ज – कोलकाता नाइट रायडर्सला 27 धावांनी हरवले.

  • 2020: मुंबई इंडियन्स – दिल्ली कॅपिटल्सला 5 विकेट्सने हरवले.

  • 2019: मुंबई इंडियन्स – चेन्नई सुपर किंग्जला 1 धावांनी हरवले.

  • 2018: चेन्नई सुपर किंग्ज – सनरायझर्स हैदराबादला 8 गडी राखून हरवले.

  • 2017: मुंबई इंडियन्स – राईझिंग पुणे सुपरजायंट्सला 1 धावांनी हरवले.

  • 2016: सनरायझर्स हैदराबाद – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 8 धावांनी हरवले.

  • 2015: मुंबई इंडियन्स – चेन्नई सुपर किंग्जला 41 धावांनी हरवले.

  • 2014: कोलकाता नाइट रायडर्स – किंग्ज इलेव्हन पंजाबला 3 गडी राखून हरवले.

  • 2013: मुंबई इंडियन्स – चेन्नई सुपर किंग्जला 23 धावांनी हरवले.

  • 2012: कोलकाता नाइट रायडर्स – चेन्नई सुपर किंग्जला 5 गडी राखून हरवले.

  • 2011: चेन्नई सुपर किंग्ज – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 58 धावांनी हरवले.

  • 2010: चेन्नई सुपर किंग्ज – मुंबई इंडियन्सला 22 धावांनी हरवले.

  • 2009: डेक्कन चार्जर्स – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला 6 धावांनी हरवले.

  • 2008: राजस्थान रॉयल्स – चेन्नई सुपर किंग्जला 3 गडी राखून हरवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT