पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यावर्षी टी-20 विश्वचषक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव उमटवले. या झालेल्या अंतिम सामन्यानंतर आज उभय संघांमध्ये पहिला टी-20 सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये 4 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना आज (दि.8) डर्बनच्या किंग्समीड स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 पासून सुरु होणार आहे. नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच 8 वाजता होईल.
या मालिकेमध्ये भारतीय संघ नवा कर्णधार आणि नवा प्रशिक्षक घेऊन उतरणार आहे. वास्तविक, रोहित शर्माने विश्वचषकानंतरच टी-20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर सूर्याला टी-20 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दुसरीकडे, गौतम गंभीरच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण या टी-20 मालिकेत कोचिंगची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याचे कारण म्हणजे गंभीर न्यूझीलंड कसोटी मालिकेत व्यस्त होता. आता त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे, जिथे 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
एकूण T20 सामने: 27
भारतने जिंकलेले सामने : 15
दक्षिण आफ्रिकेने जिंकलेले सामने : 11
अनिर्णीत सामने : 1
एकूण खेळलेले टी-20 सामने : 15
भारताने जिंकलेले सामने : 10
पराभूत झालेले सामने : 4
अनिर्णीत झालेला सामना : 1
8 नोव्हेंबर – पहिली टी-20, डर्बन
10 नोव्हेंबर- दुसरा टी-20, गेकेबरहा
13 नोव्हेंबर- तिसरा टी-20, सेंच्युरियन
15 नोव्हेंबर- चौथा टी-20, जोहान्सबर्ग
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या 5 द्विपक्षीय टी-20 मालिकेत हरलेला नाही. या कालावधीत भारताने 2 मालिका जिंकल्या आहेत. तर 3 टी-20 मालिका अनिर्णित राहिली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 9 द्विपक्षीय टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत भारताने 4 आणि आफ्रिकेने 2 विजय मिळवले आहेत. ३ मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैभव. , आवेश खान आणि यश दयाल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोन्गवाना, न्काबा पीटर, रायन सिमेला रिकेलन, लुआन रिकेलन सिपमला आणि ट्रिस्टन स्टब्स.