गौतम गंभीर. (BCCI)
स्पोर्ट्स

Gautam Gambhir Death Threat | टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांना 'ISIS Kashmir'कडून जीवे मारण्याची धमकी

दिल्लीतील राजिंदर नगर पोलिस स्थानकात तक्रार दाखल

दीपक दि. भांदिगरे

Gautam Gambhir Death Threat

नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना 'आयएसआयएस काश्मीर' (ISIS Kashmir) कडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या प्रकरणी गंभीर यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून तातडीने दखल घेण्याची मागणी केली. त्यांनी औपचारिकपणे राजिंदर नगर पोलिस स्थानकाचे एसएचओ आणि दिल्ली सेंट्रलचे डीसीपी यांच्याकडे एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती सुरक्षा यंत्रणांकडे केली आहे. या धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, दिल्ली पोलिस या प्रकरणी सखोल चौकशी करतील. तसेच गंभीर आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलतील, अशी अपेक्षा आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्येही मिळाली होती धमकी

२२ एप्रिल रोजी गंभीर यांना धमकीचे दोन ईमेल मिळाले. एक दुपारी आणि दुसरा संध्याकाळी ईमेल आला. दोन्हीमध्ये 'IKillU' असा धमकीचा मेसेज होता. गंभीर यांना अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. नोव्हेंबर २०२१ मध्ये, गंभीर खासदार असताना त्यांना असाच एक ईमेल आला होता.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल गंभीर यांनी निषेध व्यक्त केला होता. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. ''मृतांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. यासाठी जबाबदार असलेल्यांना किमत मोजावी लागेल. भारत स्ट्राइक करेल.'' असे २२ एप्रिल रोजीच्या X वरील पोस्टमध्ये गंभीर यांनी म्हटले होते.

गंभीर व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, विराट कोहली, सूर्यकुमार यादव यासह अनेक क्रिकेटपटूंनीही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीवत्स गोस्वामी यांनी पाकिस्तानसोबतचे क्रीडा संबंध पूर्णपणे तोडण्याची मागणी केली आहे.

१९६० चा सिंधू जल करार स्थगित

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणे थांबवत नाही आणि दहशतवादाविरोधात स्पष्ट भूमिका घेत नाही तोपर्यंत सिंधू जल करार भारताने तात्काळ स्थगित केला आहे. सिंधू नदीद्वारे पाकिस्तानला पाणी पुरवले जाते. तसेच भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी ४८ तासांचा तर पाकिस्ताच्या सल्लागारांनाही देश सोडण्यासाठी ७ दिवसांची मुदत दिली आहे. भारताने आपल्या मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन करत हा डिप्लोमॅटिक सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT