India Vs Pakistan Digital Reach pudhari photo
स्पोर्ट्स

India Vs Pakistan Digital Reach: छप्पर फाड के... ICC T20 World Cup मध्ये कधी झालं नाही ते यंदाच्या भारत-पाक सामन्यात घडलं

भारत - पाकिस्तान सामन्यानंतर भारतातील अधिकृत ब्रॉडकास्टर जिओ स्टारनं भारत पाकिस्तान सामन्यात किती व्ह्युवरशिप होती याची आकडेवारी सांगितली.

Anirudha Sankpal

India Vs Pakistan Digital Reach : यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारत - पाकिस्तान सामना होणार की नाही हे अवघे काही दिवस आधीपर्यंत ठरत नव्हतं. पाकिस्तानने भारताच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची भाषा केली होती. मात्र आयसासीने आर्थिक दंड आणि कारवाई करणार असा सज्जड दम भरल्यावर सामन्याला चार दिवस शिल्लक असताना पाकिस्ताननं आपला निर्णय बदलला. मात्र तरी देखील कोलंबोमधील सामन्यात पहिला चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याबाबत अनिश्चितता होती. अखेर सामना झाला अन् व्ह्युवरशिपच्या दृष्टीकोणातून तो रेकॉर्ड ब्रेक झाला.

नवीन भारत - पाकिस्तान रेकॉर्ड

ज्यावेळी बांगलादेशची टी २० वर्ल्डकपमधून एक्झिट झाली त्यानंतर पाकिस्ताननं स्पर्धेतील सर्वात महत्वाचा आणि सर्वाधिक कमाईचा सामना भारत - पाकिस्तान सामन्यावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. नंतर त्यांनी यू टर्न घेतला.

सामन्यानंतर भारतातील अधिकृत ब्रॉडकास्टर जिओ स्टारनं भारत पाकिस्तान सामन्यात किती व्ह्युवरशिप होती याची आकडेवारी सांगितली. त्यांनी भारत पाकिस्तान सामन्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाल्याचं सांगितलं. या सामन्यात डिजीटल रीच हा १६३ मिलियन अर्थात १६.३० कोटी इथका होता. ही आकडेवारी कोणत्याही आयसीसी टी २० इव्हेंटपेक्षा जास्त आहे. २०२४ च्या टी २० वर्ल्डकपमधील भारत - दक्षिण अफ्रिका फायनलसामन्यापेक्षाही यंदाच्या भारत - पाकिस्तान सामन्याने जास्त व्ह्युवरशिप खेचली आहे.

ऐतिहासिक वाढ

२०२४ च्या टी २० वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यापेक्षा यंदाच्या भारत - पाकिस्तान सामन्यानं रिचच्या बाबतीत ५६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. फक्त मोबाईलवर आयसीसी टी २० मधील लीग स्टेजच्या सामन्यातील सर्वोच्च व्ह्युवरशिप नोंदवली. ही व्ह्युवरशीप गेल्या भारत - पाकिस्तान सामन्यापेक्षा १.२ पट अधिक होती. तर टीव्हीच्या बाबतीत हीच वाढ २.४ पटीनं जास्त होती.

जर या सामन्याबाबत कोणाच्या मनात शंका असेल तर ती शंका या आकडेवारीमुळं दूर झाली आहे. या सामन्यानं एकूण २० बिलियन्स मिनिट वॉच टाईम मिळवला आहे. गेल्यावेळीपेक्षा हा वॉच टाईम ४२ टक्क्यांनी वाढला आहे. भारतानं लीग स्टेजमधील सामन्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. आता टी २० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील स्कोअर आता ८-१ असा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT