IND vs PAK Live Hong Kong Sixes 2025 Live : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक लढत आज होणार आहे. हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत या दोन्ही संघांमध्ये आज, शुक्रवार (7 नोव्हेंबर) रोजी सामना रंगणार आहे. भारतीय संघाचं नेतृत्व अनुभवी विकेटकीपर-बॅटर दिनेश कार्तिक करत आहे, तर पाकिस्तान संघाचं नेतृत्व अब्बास अफरीदीच्या हाती आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी सुरू होईल. भारताच्या संघात कार्तिकसोबत रॉबिन उथप्पा, भरत चिपली, शाहबाज नदीम, प्रियांक पांचाल, स्टुअर्ट बिन्नी आणि अभिमन्यु मिथुन यांचा समावेश आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना पूल-सी मध्ये ठेवण्यात आलं आहे, ज्यात कुवेत संघाचाही समावेश आहे. एकूण 12 संघांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागण्यात आलं असून, प्रत्येक गटातून फक्त दोन सर्वोत्तम संघच एलिमिनेशन राऊंडमध्ये जाणार आहेत. हा फक्त सहा षटकांचा (6 overs) सामना असला तरी, हाँगकाँग सिक्सेस नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचक ठरतो.
मागील सिझनमध्ये रॉबिन उथप्पाने भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं, ज्यात मनोज तिवारी आणि स्टुअर्ट बिन्नीही खेळले होते. यंदा पुन्हा बिन्नी आणि उथप्पा भारतीय संघात परतले असून ते कार्तिकसोबत मैदानात उतरणार आहेत. मात्र, रविचंद्रन अश्विन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहे.
टीव्हीवर LIVE प्रसारण:
भारतात Sony Sports Network वर हाँगकाँग सिक्सेस 2025 चे सर्व सामने थेट प्रसारित केले जाणार आहेत.
मोबाईलवर लाईव्ह स्ट्रीमिंग:
प्रेक्षक FanCode App वर सर्व सामने पाहू शकतील.
भारतीय संघ
दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, भरत चिपली, शाहबाज नदीम, प्रियांक पांचाल, स्टुअर्ट बिन्नी, अभिमन्यु मिथुन
पाकिस्तानी संघ
मुहम्मद शहजाद, माज सदाकत, अब्दुल समद, ख्वाजा नफे, साद मसूद, शाहिद अजीज, अब्बास अफरीदी
हा सामना हाँगकाँग सिक्सेस क्रिकेट स्पर्धेत नवीन अध्याय लिहिलं अशी अपेक्षा आहे. छोटा फॉरमॅट असला तरी दोन्ही संघांच्या स्फोटक फलंदाजांमुळे चाहत्यांना एका रोमांचक सामन्याचा आनंद मिळणार हे नक्की.