India U19 vs Australia U19 3rd ODI Pudhari
स्पोर्ट्स

India U19 Playing XI: 5 मोठे बदल! अन्वय द्रविड संघाबाहेर, आर्यवीर सेहवागला मिळाली संधी; पाहा भारताची संपूर्ण Playing XI

India U19 vs Australia U19 3rd ODI: भारताने ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल पाच बदल केले आहेत.

Rahul Shelke

India U19 vs Australia U19 3rd ODI: राजकोटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले असून आता तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा क्लीन स्वीप करण्याचे लक्ष्य भारतीय संघासमोर आहे.

भारतीय संघात पाच मोठे बदल

तिसऱ्या वनडेसाठी भारतीय अंडर-19 संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये तब्बल पाच बदल केले आहेत. सलामीवीर अन्वय द्रविडला या सामन्यातून बाहेर करण्यात आले आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. त्याच्या जागी रजत बघेलचा संघात समावेश करण्यात आला असून तो यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे.

अन्वय द्रविडसोबतच यशवर्धन चौहान, वीके विनीथ, यशवीर गौड आणि चिगुरुपती वेंकटा यांनाही तिसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी अर्जुन राजपूत, आर्यन सवसानी, शाविन विनोद आणि मनल चौहान यांना संधी देण्यात आली आहे.

यशवर्धन चौहानला संघाबाहेर ठेवल्याने चर्चा होत आहे. त्याने मालिकेतील दुसऱ्या वनडेत शतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आर्यवीर सेहवागकडे सलामीची जबाबदारी

तिसऱ्या वनडेत भारतासाठी लक्ष्य राजेश रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग डावाची सुरुवात करतील. त्यानंतर रजत बघेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरेल. मध्यफळीत वीके विनीथ, कुशाग्र ओझा आणि मनल चौहान यांच्यावर फलंदाजीची जबाबदारी असेल.

गोलंदाजी विभागात अर्जुन राजपूत, आर्यन सवसानी, शाविन विनोद, काव्या पटेल आणि मोहित उलवा यांचा समावेश करण्यात आला आहे.

तिसऱ्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन

लक्ष्य राजेश रायचंदानी (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, रजत बघेल (यष्टीरक्षक), वीके विनीथ, कुशाग्र ओझा, मनल चौहान, अर्जुन राजपूत, आर्यन सवसानी, शाविन विनोद, काव्या पटेल आणि मोहित उलवा.

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन

नील पटेल, चार्ली हेंडरसन (यष्टीरक्षक), मैथ्यू लॉफ, जॅक जोसनेक (कर्णधार), ब्लेक कैटल, जेड हॉलिक, जॅकब पिएट्ज़, स्पेन्सर ग्रीन, केसी बार्टन, विल बायरोम आणि एली ब्रेन.

भारताने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घालण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. त्यामुळे राजकोटमधील हा सामना ऑस्ट्रेलियासाठी मालिकेतील पहिला विजय मिळवण्याची, तर भारतासाठी क्लीन स्वीप पूर्ण करण्याची संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT