पहिल्या कसोटीपूर्वी प्रसिद्ध कृष्णाच्‍या गोलंदाजीवर सराव करताना करुण नायरला दुखापत झाली.  File Photo
स्पोर्ट्स

India vs England first Test : टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी बातमी! हेडिंग्ले कसोटीपूर्वी करुणला दुखापत

इंग्‍लंडविरुद्‍धच्‍या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून होणार प्रारंभ

पुढारी वृत्तसेवा

India vs England first Test : भारत आणि इंग्‍लंड कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, २० जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे सुरु होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि आर. अश्विन यांच्या निवृत्तीनंतर संक्रमणाच्या टप्प्यातून जात असलेल्या टीम इंडियासाठी ही मालिका आव्‍हानात्‍मक असणार आहे. अशातच बुधवारी सरावावेळी भारताचा स्‍टार फलंदाज दुखापत झाल्‍याने टीम इंडियावरील दबाव आणखी वाढला आहे.

करुण नायरला दुखापत

देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्‍या दमदार कामगिरीच्‍या जोरावर करुण नायरने सुमारे आठ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. तो सध्या उत्कृष्ट फॉर्मात आहे. मालिकेपूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात द्विशतक झळकावून त्याने आपली निवड सार्थ ठरवली आहे. त्यामुळे त्‍याची पहिल्‍या कसोटीसाठी संघातील निवड निश्‍चित मानली जात आहे. मालिकेपूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत द्विशतक झळकावून त्याने निवड योग्य असल्याचे सिद्ध केले होते. आता पहिल्या कसोटीपूर्वी नायरच्या बरगड्यांना दुखापत झाली. प्रसिद्ध कृष्णाच्‍या गोलंदाजीवर सराव करताना त्‍याला दुखापत झाली. तो अस्वस्थ दिसत होता. दुखापत गंभीर वाटत नसली तरी याबाबत अद्‍याप कोणताही खुलासा करण्‍यात आलेला नाही. आता २०१७ नंतर तो आपला पहिला कसोटी सामना खेळण्याची अपेक्षा असल्याने करुण नायरसाठी ही एक मोठी संधी आहे.

२००७ पासून भारताने इंग्लंडमध्ये एकही मालिका जिंकलेली नाही

भारताने २००७ पासून इंग्लंडमध्ये एकही मालिका जिंकलेली नाही. आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी ही टीम इंडियासाठी आव्हान असेल. भारतीय संघात करुण नायरचे जवळजवळ आठ वर्षांनंतर संघात पुनरागमन झाले आहे. आता रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची जागा घेणार्‍या खेळाडूच्‍या शोधात संघ व्‍यवस्‍थापन आहे. केएल राहुलला बढती मिळण्‍याची शक्‍यता आहे. तर कर्णधार गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असे मानले जात आहे. तिसरे आणि सहावे स्थान रिक्त राहील. तिसऱ्या क्रमांकासाठी साई सुदर्शन आणि अभिमन्यू ईश्वरन यांच्यात चुरस असेल. करुण नायर बहुतेकदा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असे मानले जात आहे. आता शुक्रवार, २० जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे होणार मालिकेतील पहिल्‍या सामना टीम इंडियाची खर्‍या अर्थाने 'कसाेटी' पाहणारा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT