IND vs PAK Asia Cup 2025 Pudhari
स्पोर्ट्स

IND vs PAK Asia Cup 2025 | भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही? इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे COO स्पष्टच बोलले...

IND vs PAK Asia Cup 2025 | 14 सप्टेंबरला नियोजित 'हाय व्होल्टेज' लढत, आशिया कप 2025 साठी दुबई सज्ज

Akshay Nirmale

IND vs PAK Asia Cup 2025

दुबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे! आशिया कप 2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ठरल्याप्रमाणे 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे पार पडणार आहे. या सामन्याच्या रद्द होण्याच्या शक्यतेवर काही दिवसांपासून चर्चा सुरु होती, मात्र आयोजकांनी यावर स्पष्टता दिली आहे.

कोण काय म्हणाले?

इमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे (ECB) चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुभान अहमद यांनी सांगितले की, “WCL (World Championship of Legends) ही खासगी स्पर्धा होती आणि आशिया कप सारख्या अधिकृत टूर्नामेंटशी तिची तुलना करता येत नाही. आशिया कपसाठी सर्व आवश्यक सरकारी परवानग्या आधीच घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता फारच कमी आहे.”

सेमीफायनल किंवा फायनलमध्ये आमने सामने येऊ शकतात

भारत-पाकिस्तान सामन्याला कायमच राजकीय आणि सामाजिक पातळीवर गोंधळाचा सामना करावा लागतो. अनेक भारतीय चाहते आणि काही माजी खेळाडूंचं मत आहे की, भारताने पाकिस्तानविरुद्ध न खेळता सामना बहिष्कृत करावा.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आशिया कपसाठी परिस्थिती वेगळी असल्याचे आयोजक स्पष्टपणे सांगतात. तथापि, भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात.

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक

दिनांक वार गट सामना ठिकाण

  • 9 सप्टेंबर मंगळवार B अफगाणिस्तान vs हाँगकाँग अबूधाबी

  • 10 सप्टेंबर बुधवार A भारत vs UAE दुबई

  • 11 सप्टेंबर गुरुवार B बांगलादेश vs हाँगकाँग अबूधाबी

  • 12 सप्टेंबर शुक्रवार A पाकिस्तान vs ओमान दुबई

  • 13 सप्टेंबर शनिवार B बांगलादेश vs श्रीलंका अबूधाबी

  • 14 सप्टेंबर रविवार A भारत vs पाकिस्तान दुबई

  • 15 सप्टेंबर सोमवार A UAE vs ओमान अबूधाबी

  • 15 सप्टेंबर सोमवार B श्रीलंका vs हाँगकाँग दुबई

  • 16 सप्टेंबर मंगळवार B बांगलादेश vs अफगाणिस्तान अबूधाबी

  • 17 सप्टेंबर बुधवार A पाकिस्तान vs UAE दुबई

  • 18 सप्टेंबर गुरुवार B श्रीलंका vs अफगाणिस्तान अबूधाबी

  • 19 सप्टेंबर शुक्रवार A भारत vs ओमान अबूधाबी

सुपर फोर सामने (Super Fours):

दिनांक वार सामना ठिकाण

  • 20 सप्टेंबर शनिवार B1 vs B2 दुबई

  • 21 सप्टेंबर रविवार A1 vs A2 दुबई

  • 23 सप्टेंबर मंगळवार A2 vs B1 अबूधाबी

  • 24 सप्टेंबर बुधवार A1 vs B2 दुबई

  • 25 सप्टेंबर गुरुवार A2 vs B2 दुबई

  • 26 सप्टेंबर रविवार A1 vs B1 दुबई

फायनल मॅच

दिनांक वार ठिकाण

28 सप्टेंबर मंगळवार दुबई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT