IND Vs NZ Live Streaming pudhari
स्पोर्ट्स

IND Vs NZ Live Streaming: आता महागडे सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही... इथे पाहा फ्रीमध्ये भारत - न्यूझीलंड वनडे मालिका

Anirudha Sankpal

India Vs New Zealand Live Streaming: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच वनडे सामन्यांची मालिका ४ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा ऑकलँडच्या ईडन पार्कमध्ये होत आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार असून जगातील एक नंबरची टीम मालिका जिंकण्यासाठी जोर लावणार आहे.

या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज हे दिग्गज खेळाडू भारतीय संघाकडून खेळणार आहेत. त्यांच्याकडून दमदार कामगिरीची आशा आहे. अष्टपैलू नीतीश कुमार रेड्डी देखील पहिल्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

न्यूझीलंडच्या संघाबाबत बोलायचं झालं तर कर्णधार मिचेल सँटनरच्या नेतृत्वात घरच्या मैदानात खेळणार आहे. मात्र मालिकेपूर्वीच रचिन रविंद्र, मार्क चॅपमॅन आणि डेवॉन कॉन्वे यांच्या रूपात मोठा धक्का बसला आहे. रचिन आणि चॅपमॅन मालिकेला मुकणार असून कॉन्वे पहिल्या सामन्यात खेळणार नाहीये. भारताने नुकतेच टी २० मालिका ३-२ अशी खिशात टाकली आहे. त्यामुळे आता वनडे मालिकेबाबत सर्वांना उत्सुकता आहे.

सामना मोफत कुठं पाहायचा

क्रिकेट चाहत्यांना भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना हा मोफत पाहण्याची संधी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचे थेट प्रक्षेपण हे डीडी फ्री डीशच्या डीडी स्पोर्ट्स चॅनलवरून करण्यात येणार आहे. त्यामुळं आता क्रिकेट चाहत्यांना कोणतेही सब्सक्रिप्शन न घेता दाखील सामन्याचा आनंद अगदी मोफत लुटता येणार आहे.

कधी अन् कुठं पाहायता सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेचा पहिला सामना हा ४ नोव्हेंबर रोजी ऑकलँढ येथील ईडन पार्कमध्ये होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे. सकाळी ७ वाजता टॉस होणार आहे.

कुठून होणार टेलिकास्ट आणि लाईव्ह स्ट्रीमिंग?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याचे थेच प्रेक्षपण हे सोनी टेन १ आणि सोनी टेन ३ चॅनलवर होणार आहे. तर ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्हच्या अॅप किंवा वेबसाईटवर उपलब्ध आहे. या प्रकारे क्रिकेट चाहत्यांना टीव्ही आणि लाईव्ह स्ट्रीमिंग या दोन्ही माध्यमातून सामना पाहता येणार आहे.

कसं आहे शेड्युल?

भारत - न्यूझीलंड मालिकेतील सर्व सामने हे डे नाईट होणार आहेत. त्यामुळं हे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७.३० ला सुरू होतील. न्यूझीलंडमध्ये ही वेळ दुपारी ३ वाजण्याची असते. तर ब्रिटनमध्ये रात्री २ वाजता सामना पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT