स्पोर्ट्स

IND vs AUS ODI : ४५ वर्षे, १९ सामने आणि केवळ २ विजय! शुभमन गिलच्या नेतृत्वावर 'कलंक' लागण्याची शक्यता?

सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे निराशाजनक रेकॉर्ड

रणजित गायकवाड

ठळक मुद्दे

  • टीम इंडियाला क्लिन स्वीपचा धोका

  • कॅप्टन म्हणून शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी

  • सिडनी क्रिकेट मैदानावर टीम इंडियाचे १६ पराभव

IND vs AUS ODI Series 2025 India vs Australia 3rd ODI Match Head to Head

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत पराभूत झाल्यामुळे भारतीय संघाने ही एकदिवसीय मालिका आधीच गमावली आहे. आता सिडनीमध्ये शनिवारी (दि. २५) खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या सामन्यात मैदानात उतरून भारतीय संघ आपला सन्मान राखण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर, कर्णधार शुभमन गिल यांच्यावरही कर्णधार म्हणून 'क्लीन स्वीप'चा कलंक लागू नये, अशी त्याची इच्छा असणार आहे.

१६ पराभव

या मैदानावर जर भारताच्या रेकॉर्डकडे पाहिले तर तो अत्यंत निराशाजनक आहे. भारतीय संघाने येथे पहिला एकदिवसीय सामना १९८० मध्ये खेळला होता. तेव्हापासून गेल्या ४५ वर्षांत भारताने येथे एकूण २२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. तथापि, सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताला केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे, तर १६ वेळा ऑस्ट्रेलियाने या मैदानावर भारताला पराभूत केले आहे.

प्रतीक्षा कधी संपणार?

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये १९८० मध्ये पहिला एकदिवसीय सामना जिंकला होता. त्यानंतर, तब्बल ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २०१६ मध्ये भारताला या मैदानावर दुसरा एकदिवसीय विजय मिळाला. या दोन्ही वेळी भारताचे नेतृत्व एम.एस. धोनीने केले होते. आता शुभमन गिलकडे एक चांगली संधी चालून आली आहे. तो या मैदानावर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय सामन्यात पराभूत करणारा दुसरा भारतीय कर्णधार बनू शकतो.

सध्या पुन्हा एकदा भारताकडे ९ वर्षांची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे. भारतीय संघाने येथे शेवटचा एकदिवसीय सामना २०२० मध्ये खेळला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ५१ धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त भारताने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एकदा एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आहे.

सध्या सुरू असलेल्या मालिकेचा विचार केल्यास, पहिला सामना पावसाने बाधित झाल्यामुळे कंगारू संघाने ७ विकेट्स राखून जिंकला होता. त्यानंतर, ॲडलेडच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी काही चांगल्या खेळी केल्या. मात्र, गोलंदाजीत कमतरता राहिली आणि ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्स गमावून २६५ धावांचे लक्ष्य सहज गाठले. यासह भारताने मालिका गमावली आहे. आता सिडनीमध्ये 'क्लीन स्वीप' टाळण्याची संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT