Hit the ball twice OUT: क्रिकेटमध्ये अनेक वेळा अशा घटना घडतात, ज्या पाहून स्वतः खेळाडूही चकित होतात. अशीच एक घटना रणजी ट्रॉफीच्या प्लेट लीगमधील मणिपूर विरुद्ध मेघालय सामन्यात पाहायला मिळाली. या सामन्यात मणिपूरचा फलंदाज लामाबम सिंह ‘हिट द बॉल ट्वाइस’ या दुर्मिळ नियमामुळे OUT झाला आणि मैदानावर उपस्थित असलेल्या सर्वांना काही क्षण काय घडलं हेच कळेना.
मेघालयचा गोलंदाज आर्यन बोरा याने टाकलेला एक साधा दिसणारा बॉल लामाबमने डिफेन्ड केला. बॉल बॅटला लागून खाली पडला, पण हळूहळू स्टंप्सकडे रोल होऊ लागला. विकेट उडण्याची भीती वाटल्याने लामाबमने तत्काळ प्रतिक्रिया देत दुसऱ्यांदा बॅट लावून चेंडूला थांबवले. हीच त्याची मोठी चूक ठरली.
तिथेच उभ्या असलेल्या अंपायर धर्मेश भारद्वाज यांनी लगेच हात वर केला आणि त्याला “Hit the ball twice – OUT” ठरवलं. मेघालयने अपील केले आणि खेळाडू वाद न घालता शांतपणे मैदान सोडून गेला.
मैदानावरील अधिकाऱ्यांनी ESPNcricinfo ला सांगितले की “बॉल पॅडने थांबवण्यास परवानगी होती. पण लामाबमने बॅट वापरली, आणि ते नियमात बसत नाही. नियमांनुसार दिलेला OUT अगदी योग्य होता. त्यामुळे खेळाडूंनी कोणताही वाद न घालता निर्णय मान्य केला.
क्रिकेटचा MCC Rule 34.1.1 सांगतो, बॉल एकदा तुमच्या बॅटला किंवा शरीराला लागला, आणि तुम्ही जाणूनबुजून पुन्हा बॅटने त्याला मारलं, तर तुम्ही OUT होता. फक्त एक अपवाद आहे जर तुम्ही विकेट वाचवण्यासाठी बॉल थांबवला तर OUT दिलं जात नाही. अंपायरांना वाटलं की लामाबमने बॅट वापरून जाणूनबुजून चेंडू मारला, म्हणून त्याला OUT करण्यात आलं.
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात असा OUT याआधी फक्त चार वेळा देण्यात आला आहे.
ते खेळाडू:
आंध्रचे K. बावन्ना (1963-64)
J&K चे शाहिद परवेज (1986-87)
तमिळनाडूचे आनंद जॉर्ज (1998-99)
J&K चे ध्रुव महाजन (2005-06)
आता लामाबम सिंह हे भारतीय क्रिकेटमधील पाचवे खेळाडू ठरले आहेत.