Glenn Phillips Angry RCB vs GT pudhari
स्पोर्ट्स

Glenn Phillips Angry RCB vs GT: हा मूर्खासारखा प्रश्न आहे... पत्रकार परिषदेत गुजरातचा ग्लेन फिलिप्स एवढा का भडकला?

Anirudha Sankpal

Glenn Phillips Angry RCB vs GT IPL 2026: आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी पराभव करत आयपीएलची फायनल गाठली. रॉयल चॅलेंजर बंगळुरूने २० षटकात ५ बाद २५४ धावांचा डोंगर उभा केला होता. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने ३३ चेंडूत ९३ धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने आपल्या डावात ९ षटकार आणि पाच चौकार मारले होते. विराट कोहली आणि कृणाल पांड्या यांनी देखील चांगली फलंदाजी करत प्रत्येकी ४३ धावांचे योगदान दिले. गुजरातचा संघ सामन्यात संघर्ष करताना दिसला.

दरम्यान, सामन्यानंतर प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधी न मिळालेल्या ग्लेन फिलिप्सने गुजरात टायटन्सच्या वतीने प्रश्नांची उत्तरे दिले. या पत्रकार परिषदेवेळी ग्लेन फिलिप्स एका प्रश्नावर जाम भडकलेला दिसला. त्याने हा प्रश्न मूर्खासारखा असल्याचे म्हटले.

गुजरात ज्यावेळी आरसीबीचे २५४ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला त्यावेळी त्यांची फलंदाजी ढेपाळली होती. शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जॉस बटलर हे स्वस्तात माघारी परतले. गुजरातचा संघ १६२ धावात तंबूत परतला.

यावरूनच पत्रकारांनी फिलिप्सला गुजरातने आरसीबीच्या २५४ धावा झाल्यावर मानसिकदृष्ट्या हार मनली होती की असा प्रश्न विचारला. त्यावेळी भडकलेल्या ग्लेन फिलिप्सने, 'हा मूर्खासारखा प्रश्न आहे. हा खरोखर मुर्खासारखा प्रश्न आहे. कोणीही तिथं कधी हरतोय याची वाट पाहण्यासाठी जात नाही. तुम्हाला माहिती आहे का. आम्ही हा सामन्यात हार मानली आहे. आम्ही असं का करणार आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत. हा खूपच भयानक प्रश्न होता.'

ग्लेन फिलिप्स पुढे म्हणाला, 'आम्ही मैदानावर जातो आणि आमचं सर्वस्व पणाला लावलतो. दुर्दैवाने तुम्ही ज्यावेळी २५० धावा चेस करत असता त्यावेळी सर्व काही योग्य व्हावं लागतं. आम्ही मैदानावर जातो आणि सर्व काही योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. मात्र कधी कधी ते होत नाही.'

ग्लेन फिलिप्सने एवढी मोठी धावसंख्या चेस करताना दडपण नक्की असतं. एखादी छोटी चूक देखील खूप महागात पडू शकते. फिलिप्सने धावसंख्येचा दबाव डाव ढासळण्यात मोठी भूमिका निभावतो. मात्र संघाने मैदानावर आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं हे देखील तो अधोरेखित करतो.

फिलिप्स म्हणतो, 'तुम्ही २५० धावा चेस करत असता त्यावेळी धावसंख्येचे मोठे दडपण असते. तुम्हाला माहिती असतं की फार कमी संघांनी असा ही धावसंख्या चेस केलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT