Golden Boot FIFA WC 2026 pudhari
स्पोर्ट्स

Golden Boot FIFA WC 2026: गोल्डन बूटसाठी मेस्सी-एम्बाप्पेमध्ये काटें की टक्कर, तर नॉर्वेचा Viking अन् इंग्लंडचा King ही रेसमध्ये

Anirudha Sankpal

Golden Boot FIFA WC 2026: फिफा वर्ल्डकप २०२६ मध्ये गोल्डन बूटची स्पर्धा तीव्र झाली आहे. आता क्वार्ट फायनल अन् सेमी फायनलमधील संघातील खेळाडू या रेसमध्ये असल्यामुळं यंदाचा गोल्डन बूट कोण घेऊन जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

नुकत्याच झालेल्या फ्रान्स मोरोक्को सामन्यात फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एम्बाप्पेने एक गोल करत लिओनेल मेस्सीची बरोबरी केली. आता मेस्सी आणि एम्बाप्पेचे यंदाच्या स्पर्धेत प्रत्येकी ८ गोल झाले आहेत. अर्जेंटिना आपला पुढचा सामना हा 12 जुलै रोजी स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. तिथं मेस्सीला सरशी मारण्याची संधी आहे.

मात्र या दोघांव्यतिरिक्त अजून दोन खेळाडू आहेत जे गोल्डन बूटच्या रेसमध्ये आपलं आव्हान जीवंत ठेवलं आहे. नॉर्वेचा हालँडने आतापर्यंत ७ गोल मारले आहेत. तो या यादीत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन हा ६ गोलसह चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे जर हॅरी केनने यंदाचा गोल्डन बूट जिंकला तर तो फिफा वर्ल्डकपच्या इतिहासात दोनवेळा गोल्डन बूट जिंकणारा पहिला खेळाडू ठरणार आहे. एम्पाप्पेला देखील सलग दुसऱ्यांदा गोल्डन बूट जिंकण्याची मोठी संधी आहे.

गोल्डन बूटच्या स्पर्धेत आघाडीवर असलेले खेळाडू

  • किलियन एम्बाप्पे - ८ गोल ३ असिस्ट

  • लिओनेल मेस्सी - ८ गोल १ असिस्ट

  • अर्लिंग हालँड - ७ गोल ० असिस्ट

  • हॅरी केन - ६ गोल १ असिस्ट

  • उस्मान डेम्बेले - ५ गोल २ असिस्ट

विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरूद्ध १२ जुलैलाच भिडणार असून या सामन्याकडे Viking vs England अशा ऐतिहासिक दृष्टीकोणातून देखील पाहिलं जात आहे. गोल्डन बूटच्या रेसमध्ये इंग्लंडचा ज्यूड वेलिंगहम आणि स्पेनचा मिकेल देखील आहेत. विशेष म्हणजे या यादीतील क्रमांक ६ पासून १० पर्यंतच्या खेळाडूंनी प्रत्येकी ४ - ४ गोल केले आहेत तर एक एक गोल असिस्ट केले आहेत.

फ्रान्सचा सलग तिसऱ्यांदा सेमी फायनलमध्ये प्रवेश

विशेष म्हणजे फ्रान्स सलग तिसऱ्या फिफा वर्ल्डकपमध्ये सेमी फायनलमध्ये पोहचला आहे. अशी कामगिरी करणारा तो तिसरा देश झाला आहे. यापूर्वी जर्मनीने २००२ ते २०१४ पर्यंत सलग चारवेळा सेमी फायनल गाठली होती. तर ब्राझीलने १९९४ ते २००२ पर्यंत सलग तीनवेळा सेमी फायनल गाठली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT