Cristiano Ronaldo  pudhari
स्पोर्ट्स

Cristiano Ronaldo Retirement: मेस्सी सारखं करणार नाही... वादानंतरही रोनाल्डोची 'आंतरराष्ट्रीय' खेळण्याची इच्छा, शिक्षा भोगणार

रोनाल्डो देखील मेस्सीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू झाली होती.

Anirudha Sankpal

Cristiano Ronaldo Retirement: पोर्तुगालचा स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकतेच पोर्तुगालचा कॅम्प सोडला. त्यानंतर तो देखील लिओनेल मेस्सीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता रोनाल्डोने यावर खुलासा करत आपला प्रतिस्पर्धी मेस्सीला फोलो न करता अजून आंतरराष्ट्रीय सामने खेळणार असल्याचं सांगितलं. त्याने देशाकडून खेळण्यासाठी आपण अजून उपलब्ध असल्याचं सांगितलं.

मेस्सीच्या फेअरवेलनंतर लगेचच पोस्ट

मेस्सीच्या फेअरवेल सामन्यानंतर अवघ्या काही तासातच केलेल्या एका भल्या मोठ्या वक्तव्यात रोनाल्डने नुकत्याच नियुक्त झालेले प्रशिक्षक जॉर्ज जेसस यांनी आपला शब्द पाळलेला नाही. त्यांनी नेशन लीगच्या सामन्यात ते देशाच्या स्टार स्ट्रायकरला खेळवण्याबाबतचा शब्द पाळला नाही.

४१ वर्षाच्या रोनाल्डोने सांगितलं की त्याच्या चाहत्यांचा आणि संघातील सहकाऱ्यांची तो माफी मागतोय. 'मी माझ्या सर्व चाहत्यांना आणि सहाजिकच सर्व पोर्तुगीज लोकांना एक वचन देतो. एक किंवा त्यापेक्षा जास्त फेअरवेल मॅचेस होतील. मात्र त्याला अजून वेळ आहे.'

मी चाहत्यांची माफी मागतो अन्..

रोनाल्डो पुढे म्हणाला, 'जर मी शारीरिकदृष्ट्या फीट असेन, मी माझ्या क्लबकडून खेळत असेन, गोल करत असेन तर मग माझ्यावरील निलंबनाची कारवाई केली तरी मी देशासाठी खेळण्यासाठी उपलब्ध असेन. मी देशासाठी आजही खेळायला आणि देशाला जिंकून द्यायला तयार आहे.

रोनाल्डोला नुकत्याच झालेल्या नॉर्वेविरूद्धच्या सामन्यात राखीव खेळाडू म्हणून बसवण्यात आलं होतं. या सामन्यात पोर्तुगालने २-१ असा विजय मिळवला होता. त्यानंतर कोच जेसस यांनी रोनाल्डो डेन्मार्कविरूद्धच्या सामन्यात सुरूवातीला खेळणार नाही असं जाहीर केलं होतं. त्यानंतर रोनाल्डोने राष्ट्रीय संघाचा कॅम्प सोडला होता. पोर्तुगालने हा सामना ४-२ असा जिंकला होता.

आता रोनाल्डोवर राष्ट्रीय संघाचा कॅम्प मधेच सोडल्याबद्दल शिक्षा होऊ शकते. फेडरेशन राष्ट्रीय संघाचा कॅम्प न कळवता किंवा योग्य कारणाशिवाय सोडणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करते. त्यामुळे रोनाल्डोवर एक महिना किंवा सहा महिन्याची निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT