MPL T20 2025 Eliminator X
स्पोर्ट्स

Cricket Viral Video | फलंदाज धडकले, रनआऊट सोडा मिळाल्या 6 धावा; कोल्हापूरला चूक पडली महागात, व्हिडिओ व्हायरल

Cricket Viral Video | महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील कोल्हापूर टस्कर्स विरूद्ध रायगड रॉयल्स सामन्यातील प्रकार, नेटीझन्स म्हणाले- क्रिकेट सोडा आणि निवृत्ती घ्या

Akshay Nirmale

Cricket Viral Video Maharashtra Premier League T20 Eliminator Kolhapur Tuskers vs Raygad Royals match Vicky Ostwal

पुणे : पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये महाराष्ट्र प्रीमीयर लीग टी20 क्रिकेट स्पर्धेत एक अभूतपूर्व आणि हास्याचे फवारे उडविणारा प्रसंग घडला. त्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्सविरूद्ध रायगड रॉयल्समध्ये झालेल्या सामन्यात हा प्रसंग घडला. यात रायगडच्या विकी ओस्तवालला रनआऊटमधून बचावाची मिळालेली दुसरी संधी इतकी नाट्यमय होती की, अखेर चाहत्यांमधूनच 'क्रिकेट सोडा आणि निवृत्ती घ्या' अशी प्रतिक्रिया उमटली.

धाव घेताना दोन्ही फलंदाज धडकून कोसळले

160 धावांचा पाठलाग करताना, रायगड रॉयल्सच्या विकी ओस्तवालने कव्हर क्षेत्रात एक बॅकफूट शॉट मारून दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण धावताना दोन्ही फलंदाज चुकून एकमेकांना जोरात धडकले आणि दोघही खेळपट्टीवर कोसळले.

हा क्षण कोल्हापूर टस्कर्ससाठी सोन्याचा होता कारण त्यांना थेट रनआऊटची संधी मिळाली होती. पण त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं.

नेमकं काय घडलं?

कारण मैदानावरचा थ्रो थेट यष्टीरक्षकाकडे आला होता, पण त्याने आश्चर्यकारकरीत्या स्टम्पला चेंडू लावून रनआऊट न करता चेंडू पुन्हा गोलंदाजाकडे फेकला. त्यामुळे गोलंदाज अटमन पोरे पूर्ण गोंधळून गेला आणि चेंडू हाताळण्यात त्याने चूक केली.

तेवढ्यात दुसरा एक क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन यष्टीकडे धावला, पण त्याचा थ्रो चुकला आणि कोणताही खेळाडू बॅकअपला नव्हता. ओस्तवालने हा गोंधळ ओळखून पुन्हा क्रीज गाठली आणि रनआऊटपासून तो बचावला.

व्हिडिओ व्हायरल...

सामन्यातील या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर नेटीझन्सच्या मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

कोल्हापूर टस्कर्ससाठी ही चूक कायमस्वरूपी आठवण बनून राहणार, तर क्रिकेटप्रेमींसाठी हा क्षण हशा आणि चकित करणाऱ्या आठवणींमध्ये नोंदवला गेला आहे.

हा क्षण इतका नाट्यमय होता की सोशल मीडियावर चाहत्यांनी विनोद करत लिहिलं आहे की,– “क्रिकेट सोडा आणि सगळ्याच खेळाडूंनी निवृत्ती घ्या!”

जीवदान मिळालेल्या ओस्तवालने सामना फिरवला...

या संधीमुळे जीवदान मिळालेल्या ओस्तवालने नंतर सामना पूर्णपणे फिरवून टाकला. त्याने 54 चेंडूंमध्ये 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून रायगड रॉयल्सला विजय मिळवून दिला.

रायगड रॉयल्स पुढील फेरीत

या विजयामुळे रायगड रॉयल्सने क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला असून, आता त्यांचा पुढचा टी-20 सामना पुणेरी बाप्पा संघाशी होणार आहे. विकी ओस्तवालचा हा नशिबाचा क्षण लीगच्या संपूर्ण निकालावर परिणाम करतो का, हे पाहणं रंजक ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT