Bhuvneshwar Kumar IPL pudhari
स्पोर्ट्स

Bhuvneshwar Kumar IPL: तीन वर्षे तू भारताकडून खेळला नाहीस तरी... हर्षा भोगलेंच्या 'त्या' प्रश्नावर भूवीनं दिलेलं उत्तर ऐकाच!

Anirudha Sankpal

Bhuvneshwar Kumar Reaction: आयपीएलच्या ५४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने २० षटकात १६६ धावा केल्या होत्या. आरसीबीने हे टार्गेट २० षटकात ८ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केलं. सामन्याचा मानकरी म्हणून वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमारची निवड करण्यात आली. त्याने ४ षटकात २३ धावा देत ४ बळी घेतले. मात्र यापेक्षा त्याच्या षटकाराचीच चर्चा जास्त झाली.

षटकार की विकेट्स?

ज्यावेळी आरसीबीला शेवटच्या षटकात ३ चेंडूत १० धावांची गरज होती त्यावेळी भूवनेश्वर कुमारने फलंदाजीला आल्या आल्या षटकार मारला होता. त्यामुळं आरसीबी विजयाच्या जवळ पोहचली.

या षटकाराबाबत सामन्यानंतर हर्षा भोगले यांनी प्रश्न विचारला. भूवनेश्वर कुमारने तिलक वर्माचा त्रिफळा उडवला होता. तिलक वर्माने दमदार अर्धशतक ठोकलं होतं. हर्षा भोगले यांनी तुला तू काढलेली बोल्ड की शेवटच्या षटकात मारलेला षटकार यापैकी काय जास्त भावलं असा पहिला प्रश्न विचारला. त्यावर भूवीने अर्थात तो षटकार मी अनेकवेळा फलंदाजाला बोल्ड केलं आहे. त्यामुळं मला तो षटकारच जास्त भावला असं उत्तर दिलं.

यशाचे रहस्य काय?

हर्षा भोगले यांनी पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये दुसरा प्रश्न हा तू गेल्या साडेतीन वर्षापासून भारताकडून खेळलेला नाहीस. तरी देखील तू स्वतःला सतत खेळण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी कसं प्रेरित करतोस असा प्रश्न विचारला. त्यावेळी भूवीने डोळे उघडणारं उत्तर दिलं.

प्रेरणा नाही सातत्य

भूवनेश्वर कुमार म्हणाला, 'प्रेरणा हा माझ्यासाठी वेगळा आहे. तुम्ही एखादा व्हिडिओ पाहता, कोट पाहता आणि प्रेरित होता. मात्र ती प्रेरणा काही काळातच विरून जाते. माझ्यासाठी सातत्य अत्यंत महत्वाचं आहे. माझ्यासाठी फिजिओ आणि कोच आहेत जे मला सातत्य राखण्यात मदत करतात. माझ्याकडे माझ्या घरी देखील फिजिओची टीम आहे ते मला तंदुरूस्त ठेवतात. माझ्या यशाचे श्रेय त्यांना देखील आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT