सामना जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय खेळाडू Pudhari Photo
स्पोर्ट्स

IND vs BAN : बांगलादेशला व्हाईटवॉश; भारताने टी-20 मालिका 3-0ने जिंकली

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 अशी धुळ चारलेल्या टीम इंडियाने टी-20 मालिकेतही निर्विवाद वर्चस्व राखत व्हाईटवॉश केला. हैद्राबाद येथीस तिसऱ्या टी-20 सामन्यात तब्बल 133 धावांनी पराभव करत टी-20 मालिकाही 3-0 अशी जिंकली आहे. आजच्या सामन्यात संजू सॅमसनचे तुफानी शतक आणि सूर्याची झंझावात खेळी, तसेच सामना जिंकण्यासाठी भारतीय गोलंदाजांची देखील भक्कम साथ मिळाली. (IND vs BAN)

फलंदाजांनंतर फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 133 धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने संजू सॅमसनचे शतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 297 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला निर्धारित षटकात सात विकेट्सवर केवळ 164 धावा करता आल्या.

भारताकडून बिश्नोईने तीन, तर वेगवान गोलंदाज मयंक यादवने दोन बळी घेतले. बांगलादेशकडून तौहीद हार्डॉयने 42 चेंडूत 63 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. भारताने कसोटी मालिकेतही बांगलादेशचा 2-0 असा क्लीन स्वीप केला होता आणि आता टी-20 मालिकेतही ते मैदान साफ ​​करण्यात यशस्वी ठरले. या सामन्यात भारताने आपल्या T20 इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आणि सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाज बांगलादेशवर दडपण आणण्यात यशस्वी ठरले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT