IND vs BAN Test : चौथ्या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेश 26 धावांनी पिछाडीवर

दुस-या डावात अश्विनने घेतल्या दोन विकेट
IND vs BAN 2nd Test Day 4
भारताच्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने सुरुवातीलाच धावांचा पाऊस पाडला. (Image source- BCCI)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूर येथील ग्रीन पार्क येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. गेले दोन दिवस पावसामुळे एकही चेंडू टाकला न गेल्याने अखेर सोमवारी सामना सुरू झाला. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांमध्ये गारद झाल्यानंतर झाल्यानंतर भारताने आपला पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित केला. अशा प्रकारे भारताने बांगलादेशवर 52 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशला दोन बाद 26 धावांवर रोखले. बांगलादेशचा संघ सध्या 26 धावांनी पिछाडीवर आहे.

भारताचा पहिला डाव 9 बाद 285 धावांवर घोषित

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. बांगलादेशने त्यांच्या दुस-या डावाला सुरुवात केली आहे. तत्पूर्वी, भारताने बांगलादेशचा पहिला डाव 233 गारद केला आणि फलंदाजी करताना पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 285 धावांवर घोषित केला. यासह भारताला 52 धावांची आघाडी मिळवली. भारताकडून यशस्वी जैस्वाल (72), केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. विराट कोहली (47) आणि शुभमन गिल (39) यांचे अर्धशतक हुकले. कर्णधार रोहित शर्माने 23 धावांचे योगदान दिले.

भारताला सहावा धक्का

269 ​​धावांवर भारताला सहावा धक्का बसला. मेहदी हसन मिराजने रवींद्र जडेजाला शांतोकरवी झेलबाद केले. त्याला आठ धावा करता आल्या.

केएल राहुलचे अर्धशतक

केएल राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्याने 33 चेंडूत अर्धशतक झळकावले.

भारताला पाचवा धक्का

246 धावांवर भारताला पाचवा धक्का बसला. विराट कोहली 35 चेंडूत 47 धावा करून बाद झाला. शाकिबने त्याला क्लीन बोल्ड केले. विराटने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला.

विराट आणि राहुलमध्ये अर्धशतकी भागीदारी

विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे.

भारताला चौथा धक्का

भारताला 159 धावांवर चौथा धक्का बसला. शाकिब अल हसनने ऋषभ पंतला हसन महमूदकरवी झेलबाद केले. त्याला नऊ धावा करता आल्या. पंत बाद झाल्यानंतर केएल राहुल मैदानात उतरला. यापूर्वी शकीबने शुभमन गिलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.

भारताला तिसरा धक्का

भारताला 141 धावांवर तिसरा धक्का बसला. शुभमन गिल 36 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 39 धावा करून बाद झाला.

चहापानापर्यंत भारताची धावसंख्या २ बाद १३८ धावा 

चौथ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने पहिल्या डावात २ गडी गमावून १३८ धावा केल्या आहेत. बांगलादेशच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा भारत अजूनही ९५ धावांनी मागे आहे.

भारताला दुसरा धक्का बसला

यशस्वी जैस्वालच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला. त्याला हसन महमूदने बोल्ड केले. यशस्वीने ५१ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.

अवघ्या १०.१ षटकात शतक पूर्ण

भारताची धावसंख्या एका विकेटवर १०० धावा आहे. सर्वात वेगाने शतक पूर्ण करण्याचा विक्रम टीम इंडियाने केला आहे. या सामन्यात अवघ्या १०.१ षटकात भारताने १०० धावा पूर्ण केल्या आहेत.

भारताला पहिला धक्का, रोहित क्लीन बोल्ड

भारताला चौथ्या षटकात पहिला धक्का बसला. मेहदी हसन मिराजने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले.

कानपूरमध्ये रोहित- जैस्वालचा धावांचा पाऊस

टीम इंडियाने धडाकेबाज सुरुवात केली. भारताच्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने धावांचा पाऊस पाडला. भारताने अवघ्या ३ षटकांत धावांचे अर्धशतक पूर्ण केले. भारताने १८ चेंडूत ५१ धावा केल्या. त्यात रोहितचे ३ षटकार तर जैस्वाल ६ चौकात आणि १ षटकाराचा समावेश आहे.

बांगला देशचा पहिला डाव २३३ धावांवर गुंडाळला

बुमराह ३, सिराज, अश्विन आणि आकाश दीप यांनी प्रत्येकी २ तसेच रवींद्र जडेजाने १ विकेट घेतली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बांगला देशचा पहिला डाव सर्वबाद २३३ धावांवर गुंडाळला.

बांगला देशला पाठोपाठ धक्के

७० व्या षटकात बांगला देशला सातवा धक्का बसला. बुमराहने मेहदी हसन सिराजला आउट केले. शुभमन गिलने त्याचा झेल पकडला. त्यानंतर ७२ व्या षटकात बुमराहने बांगला देशला आणखी एक धक्का देत तैजुल इस्लामला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर सिराजने हसन महमूदला पायचित केले. तर जडेजाने खलिद अहमदला तबंत धाडत बांगला देशचा पहिला डाव संपुष्टात आणला.

विराटने झेल सोडला, मोमिनूलला जीवदान

बांगला देशचा फलंदाज मोमिनूल हक ९५ धावांवर खेळत असताना विराट कोहलीने स्लिपमध्ये त्याचा झेल सोडला. हा झेल सोपा नव्हता. यामुळे मोमिनूलला जीवदान मिळाले. यामुळे त्याने शतक पूर्ण करून बांगला देशचा डाव सावरला.

मोमिनूल हकचे कसोटीतील १३ वे शतक

बांगला देशच्या मोमिनूल हकने (Mominul Haque) आज भारताविरुद्ध शतकी खेळी केली. ३५ वर्षीय मोमिनूलने १७२ चेंडूत शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे १३ वे शतक आहे. मोमिनूल हा भारतात कसोटी शतक झळकावणारा बांगला देशचा दुसरा फलंदाज ठरला आहे. लंचब्रेकपर्यंत बांगला देशच्या ६६ षटकांत ६ बाद २०५ धावा केल्या होत्या.

बांगला देशला सहावा धक्का, सिराजने शाकीबचा अप्रतिम झेल टिपला

५६ व्या षटकांत अश्विनने शाकीब अल हसनची विकेट घेतली. मोहम्मद सिराजने शाकीबचा अप्रतिम झेल टिपला. यामुळे बांगला देशची अवस्था ५६ षटकांत ६ बाद १७० धावा अशी होती. मोमिनुल हकची शतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

बांगला देशला पाचवा धक्का, सिराजने लिटन दासला केले झेलबाद

5० व्या षटकांत बांगला देशला पाचवा धक्का बसला. मोहम्मद सिराजने लिटन दासला झेलबाद केले. हा झेल रोहित शर्माने टिपला. यामुळे बांगला देशची अवस्था ५० षटकांत ५ बाद १४८ धावा अशी होती. मोमिनुल हकने अर्धशतकी खेळी केली आहे.

बांगला देशला चौथा धक्का, बुमराहने मुशफिकुरला केले क्लीन बोल्ड

पहिल्या सत्रातील खेळाच्या सुरुवातीलच ४१ व्या षटकात बुमराहने मुशफिकुर रहीमला क्लीन बोल्ड केले. मुशफिकुर ११ धावा करुन माघारी परतला. बांगला देशची ४२ षटकांत ४ बाद ११६ धावा अशी होती.

पहिल्या दोन सत्रांतील खेळाचा वेळ वाढवला

कानपूरमध्ये आज पावसाचे वातावरण नसून सूर्यप्रकाश आहे. बांगला देशने आज १०७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कमीतकमी ९८ षटके खेळवली जाणार आहेत. पहिल्या दोन सत्रांतील खेळाचा वेळ १५ मिनिटांनी वाढवण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news