प्रशिक्षक महबूब अली जाकी.  
स्पोर्ट्स

cricket shocker news : हृदयद्रावक..! क्रिकेट सामन्यापूर्वी मैदानावरच प्रशिक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बांगलादेशमधील सिलहट आंतरराष्‍ट्रीय स्‍टेडियमवर धक्‍कादायक घटना, क्रिकेट विश्वावर शोककळा

पुढारी वृत्तसेवा

प्रशिक्षक महबूब अली जाकी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सिलहट टायटन्स, नोआखाली एक्सप्रेस आणि चट्टोग्राम रॉयल्ससह विविध संघांच्या खेळाडूंनी रुग्णालयाकडे धाव घेतली.

Bangladesh Premier League Tragic Incident

सिलहट : बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) सामन्‍यापूर्वी आज (दि.२७ डिसेंबर) एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. ढाका कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक महबूब अली जाकी यांचे शनिवारी सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामन्यापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. राजशाही वॉरियर्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्याला काही मिनिटे शिल्लक असतानाच ही दुर्घटना घडली.

अचानक मैदानावरच कोसळले जाकी

रिपोर्टनुसार, बांगलादेश प्रीमियर लीगमधील सामना सुरू होण्यापूर्वी महबूब अली जाकी मैदानावर अचानक बेशुद्ध होऊन पडले. टीम स्टाफ आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांच्‍यावर प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेने तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) मुख्य चिकित्सक देबाशीष चौधरी यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

वेगवान गोलंदाज तस्‍कीनच्‍या पुनरागमनात मोठा वाटा

या आकस्मिक घटनेमुळे स्टेडियममधील खेळाडू आणि कर्मचारी हादरून गेले. ढाका टीमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जाकी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सिलहट टायटन्स, नोआखाली एक्सप्रेस आणि चट्टोग्राम रॉयल्ससह विविध संघांच्या खेळाडूंनी रुग्णालयाकडे धाव घेतली. महबूब अली जाकी हे बांगलादेशच्या क्रिकेट वर्तुळातील मोठे नाव होते. २०१६ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान (भारत) वेगवान गोलंदाज तस्कीन अहमद याच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, तेव्हा जाकी यांनी तस्कीनसोबत अत्यंत बारकाईने काम करून त्याचे पुनरागमन सुलभ केले होते.

प्रशिक्षक म्हणून मोठे योगदान

एक माजी वेगवान गोलंदाज म्हणून जाकी यांनी नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये कोमिला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. याशिवाय त्यांनी आबाहनी आणि धानमंडी या क्लबकडून ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये आपली छाप पाडली होती. खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणासाठी वाहून घेतले. २००८ पासून ते बीसीबीच्या हाय परफॉर्मन्स युनिटशी जोडले गेले होते. दरम्‍यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "बीसीबी गेम डेव्हलपमेंटचे स्पेशलिस्ट पेस बॉलिंग कोच महबूब अली जाकी यांच्या निधनाने बोर्डाला मोठा धक्का बसला आहे. आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT