AUS vs ENG Ashes Series : कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक थरार आणि रोमांचाची अनुभूती देणारी मालिका म्हणजे ॲशेस. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे पारंपरिक प्रतिस्पर्धी जेव्हा आमने-सामने येतात तेव्हा क्रिकेटमधील नवीन विक्रमांची नोद होतेच. शुक्रवारपासून (२१ नोव्हेंबर) अॅशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ येथे खेळला जात आहे. आज या कसोटीचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी अनेक नवे विक्रम प्रस्थापित झाले. मात्र दुसर्या दिवशी असा विक्रम झाला की, १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या विक्रमाची नोंद झाली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने पहिल्या डावात १७२ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १३२ धावांवर आटोपला. इंग्लंडचा दुसरा डाव आता सुरू आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी अनेक विक्रम प्रस्थापित झाले असले तरी दुसऱ्या दिवशी एका नव्या विक्रमाची नोंद झाली. १४९ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच, कसोटीच्या पहिल्या तीन डावात प्रत्येकी एक विकेट शून्यावर पडली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोघांनीही त्यांच्या पहिल्या डावात पहिली विकेट शून्यावर गमावली. आता, दुसऱ्या डावातही इंग्लंडचा पहिला विकेट शून्यावरच पडली. मार्च १८७७ मध्ये कसोटी क्रिकेटला प्रारंभ झाला. आता ४९ वर्षांच्या प्रथम एका कसोटी सामन्यात तीन वेळा सलामीवीर शून्यावर बाद झाले.
पर्थ कसोटीत इंग्लंडला पहिल्या डावात जॅक क्रॉलीच्या रूपात पहिला धक्का बसला. तो आपले खाते उघडू शकला नाही. दुसर्या डावातही इंग्लंडने शून्यवर पहिली विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जेक वेदरल्ड देखील खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोअर शून्य होता. यानंतर, दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जॅक क्रॉली पुन्हा खाते न उघडता बाद झाला आणि त्यानंतर इंग्लंडचा स्कोअर शून्य होता. कसोटी क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे.
अॅशेस कसोटीच्या दोन्ही डावात खाते न उघडता बाद होणारा क्रॉली हा इंग्लंडचा चौथा फलंदाज ठरला आहे. या आधी ट्रेवर बेलिस, डेनिस अमिस आणि मायकेल आथर्टन यांनीही अशीच नामुष्कीजनक कामगिरी आपल्या नावावर नोंदवली होती.
अॅशेस कसोटीच्या दोन्ही डावात धावा न करता बाद झालेले इंग्लंडचे फलंदाज
ट्रेव्हर बेलिस मेलबर्न १९५९
डेनिस अमिस अॅडलेड १९७५
मायकेल अॅथर्टन मेलबर्न १९९८
जॅक क्रॉली पर्थ २०२५
इंग्लंडचा पहिला डाव ३२.५ षटकांत १७२ धावांवर संपुष्टात आला. तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५.२ षटकांत १३२ धावांवर कमी झाला. दोन्ही डावांची एकत्रित एकूण संख्या ७८.१ षटकांची होती. अॅशेस कसोटीत दोन्ही संघांसाठी हा दुसरा सर्वात कमी पहिला डाव ठरला आहे. १९०२ मध्ये मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या अॅशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२.१ षटकांमध्ये तर इंग्लंडचा पहिला डाव १५.४ षटकांत संपुष्टात आल होता. दोन्ही डावांमध्ये एकूण ४७.५ षटकांचा खेळ झाला होता.
अॅशेसमध्ये पहिल्या डावात दोन्ही संघ २०० पेक्षा कमी धावांवर बाद झाले. १९९०/९१ च्या ब्रिस्बेन (गॅबा) कसोटीत यापूर्वी दोन्ही संघांचा पहिला डाव २०० धावांच्या आत संपुष्टात आला होता. या सामन्यात इंग्लंडचा संघ १९४ धावांवर तर ऑस्ट्रेलियाचा संघ १५२ धावांवर संपला होता.
१३२ धावसंख्या ही ऑस्ट्रेलियाच्या घरगुती अॅशेस कसोटी इतिहासातील २१ व्या शतकातील दुसऱ्या सर्वात कमी पहिल्या डावातील धावसंख्या आहे. २०१०/११ च्या बॉक्सिंग डे कसोटीत (मेलबर्न) सर्वात कमी धावसंख्या नोंदवली गेली होती, जेव्हा ऑस्ट्रेलियााचा संपूर्ण संघ फक्त ९८ धावांवर तंबूत परतला होता.