File Photo.
स्पोर्ट्स

Aryaveer Sehwag U19 Asia Cup final : वडीलासारखाच झुंझार..! दुखापतीनंतरही आर्यवीर सेहवागची दमदार अर्धशतकी खेळी

३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आर्यवीर सेहवागच्या उजव्या कोपराला दुखापत

पुढारी वृत्तसेवा

Aryaveer Sehwag U19 Asia Cup final : आशिया 'अंडर-१९ कप २०२६ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा, सलामीवीर फलंदाज आर्यवीर सेहवागने अर्धशतक झळकावले. या स्पर्धेतील त्याची ही सलग तिसरी ५० हून अधिक धावांची खेळी ठरली. आर्यवीरने आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानीने भारतीय डावाची सुरुवात संयमाने केली. विशेष म्हणजे दुखापतग्रस्त असूनही त्याने अत्यंत संयमाने चिवट झुंज देत आपली अर्धशतकी खेळी साकारली.

आर्यवीर सेहवागच्या उजव्या कोपराला दुखापत

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याच्या ५ व्या षटकात, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज अली रझाचा एक वेगवान आणि उसळी घेणारा चेंडू आर्यवीरच्या बॅटच्या आतील कडेला (इनसाईड एज) लागून थेट त्याच्या उजव्या कोपरावर आदळला.

दुखापतीनंतर मैदान सोडले नाही!

अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करताना आर्यवीर सेहवागच्या उजव्या कोपराला दुखापत झाली. वेदना होत असूनही, तो मैदानाबाहेर गेला नाही आणि त्याने आपली खेळी सुरू ठेवली. चेंडू लागल्यानंतर आर्यवीरला तीव्र वेदना होत असल्याचे दिसून आले. बॅटच्या हँडलवरून त्याने आपला खालचा हात काढून घेतला. दुखापत आणि अस्वस्थता असूनही, आर्यवीरने जिद्द दाखवत फलंदाजी सुरू ठेवली. पुढील चेंडूवर चौकार मारत पाकिस्‍तान गोलंदाजांना इशाराच दिला.

६१ चेंडूत ५८ धावांची खेळी

१८ व्‍या षटकात आर्यवीरने संयम गमावला. निकाब शफीकचा गोलंदाजीवर आर्यवीर सेहवाग मोठा फटका मारण्याच्या इराद्याने क्रीझच्या बाहेर आला. मात्र, चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागल्याने त्याला पुरेसा जोर लावता आला नाही. फटका नीट न बसल्यामुळे चेंडू थेट लाँग-ऑफवर उभ्या असलेल्या उस्मान खानच्या हातात गेला. आर्यवीरने ६१ चेंडून ९ चौकार फटकवत ५८ धावांची खेळी साकारली.

पाकिस्तानचे भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य

'अंडर-१९ आशिया कप'च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ५० षटकांत ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या.पाकिस्तानसाठी सलामीवीर उस्मान खानने शतक झळкаवले, तर अब्दुल कादिर आणि कर्णधार फरहान युसूफ यांनी अर्धशतके नोंदवली. एका टप्प्यावर असे वाटत होते की पाकिस्तानची एकूण धावसंख्या ४०० च्या जवळ पोहोचेल, परंतु शेवटच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत पाकिस्तानी फलंदाजीच्या फळीला वारंवार धक्के दिले. पाकिस्तानतर्फे उस्मानने १०७, कादिरने ८० आणि युसूफने ६३ धावा केल्या. याव्यतिरिक्त, हयामने २१, अहमद हुसेनने १७, निकाब शफीकने ११, हमझा झहूरने १० आणि मोहम्मद सायमने ७ धावा केल्या. भारताच्या काव्या पटेलने चार बळी घेतले, व्यंकटने तीन बळी मिळवले, तर अर्जुन राजपूतने एक बळी घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT