Ajinkya Rahane On Dhoni Room pudhari
स्पोर्ट्स

Ajinkya Rahane On Dhoni Room: धोनीच्या रूमचा दरवाजा एकदा बंद झाल्यानंतर... रहाणेने कॅप्टन कूलबाबत वेगळाच गौप्यस्फोट केला?

Anirudha Sankpal

Ajinkya Rahane On Dhoni Room: भारतीय क्रिकेट वर्तुळात महेंद्रसिंह धोनी जसा त्याच्या कॅप्टन्सीसाठी प्रसिद्ध आहे तसाच तो खेळाडूंसोबतच्या बाँडबाबत देखील प्रसिद्ध आहे. त्याच्या रूमचे दरवाजे संपूर्ण टीमसाठी उघडे असयाचे आणि खेळाडूंचाही त्याच्या रूममध्ये राबता असायचा अशी माहिती आपल्याला जवळपास सर्वच क्रिकेटपटू देतात.

रहाणेने सांगितली वेगळीच गोष्ट

अजिंक्य रहाणेने भारतीय संघासोबतच चेन्नई सुपर किंग्ज आणि राईजिंग पुणे सुपरजायंट्समध्ये असताना धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. अजिंक्य रहाणे नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असून त्याने ऑव्हरलॅप क्रिकेट पॉडकास्टमध्ये धोनी त्याची रूम अन् त्याचा दरवाजा याबाबत एक नवी माहिती सर्वांसमोर ठेवली.

रहाणेच्या मते धोनीची रूम ही नेहमी एक भेटण्याचं ठिकाण व्हायचं. संघातील खेळाडू दिवसाच्या शेवटी तिथं जमायचे. मात्र धोनीच्या रूमचा एक अलिखीत नियम असयाचा जो सर्वजण फॉलो करायचे.

ज्यावेळी रूमचा दरवाजा बंद व्हायचा..

रहाणे पॉडकास्टमध्ये सांगातो की, 'धोनी हा खूप शांत आणि कूल आहे. तो जसा एक माणूस दुसऱ्यासोबत असतो तसाच तो असतो. त्याची रूम बऱ्याचवेळा सर्वांसाठी उघडीच असयाची. अनेकवेळा त्याच्या रूममध्ये संघातील १० ते १५ कधी कधी संपूर्ण टीमच असयाची. मात्र ज्यावेळी त्याच्या रूमचा दरवाजा बंद व्हायचा त्यानंतर आता यायला कोणाला परवानगी नव्हती.'

अजिंक्य निवृत्त, धोनीबाबत अनिश्चितता

अजिंक्य रहाणेने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र धोनी अजूनही आयपीएल खेळत असून तो आयपीएलचा पुढचा हंगाम खेळणार की नाही याबाबत मात्र अजूनही अनिश्चितता आहे. २०२६ च्या हंगामात तो ४४ वर्षाचा झालेला असेल. तो पुढचा हंगाम खेळेल की नाही याबाबत कोणालाच काहीही माहिती नाहीये. चेन्नई सुपर किंग्जने देखील याबाबत अधिकृत कोणतीही माहिती अद्याप तरी दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT