विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले file photo
स्पोर्ट्स

Cricket Selection Tragedy |वेदनादायी! टीममध्ये निवड न झाल्याने १९ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचलले टोकाचे पाऊल

Cricket Selection Tragedy | पुद्दुचेरी टी-२० क्रिकेट संघात निवड न झाल्यापासून होती प्रचंड निराश

पुढारी वृत्तसेवा

Cricket Selection Tragedy

पुद्दुचेरी : येथील एंजल गंगवानी या १९ वर्षीय महिला क्रिकेटपटूने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुद्दुचेरीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेणारी एंजल ही जीएसटी (GST) अधीक्षक काश्मीर कुमार यांची कन्या होती. या घटनेने क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

निवड प्रक्रियेतील अपयश लागले जिव्‍हारी

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, एंजल थिलासपेट 'पॉन्डिचेरी' (Pondicherry) येथील कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेत होती. अलीकडेच तिने थुतीपेट येथे पुद्दुचेरी टी-२० क्रिकेट संघासाठी झालेल्या निवड चाचणीत सहभाग घेतला होता. मात्र, अंतिम संघात तिची निवड झाली नाही. या निर्णयामुळे ती प्रचंड निराश झाली होती. तेव्हापासून ती सर्वांपासून अलिप्त राहत होती.

क्रिकेटचा सराव केल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

एंजल गेल्या दोन वर्षांपासून पुद्दुचेरीतील चोक्कनाथनपेट येथे भाड्याच्या घरात राहत होती. ती वेलरामपेट येथील एका खाजगी महाविद्यालयात 'बीबीए' (BBA) द्वितीय वर्षात शिकत होती. घरमालकाने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी रात्री ८ च्या सुमारास सराव करून ती आपल्या खोलीवर परतली होती. रात्री उशिरा तिच्या प्रशिक्षकांनी तिला फोन केला, मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर प्रशिक्षक तिला पाहण्यासाठी घरी गेले असता, ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. घरमालक आणि प्रशिक्षकांनी तिला तातडीने कधिरकामम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेले, मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

मर्यादित संधीमुळे युवा क्रिकेटपटूंवर प्रचंड दडपण

क्रिकेट आता केवळ खेळ उरला नसून तो प्रचंड दडपण आणि सततच्या प्रसिद्धीचा भाग बनला आहे. कामगिरीचा दबाव, सतत होणारे मूल्यमापन आणि करिअरमधील अनिश्चितता यामुळे तरुण खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः नवोदित आणि स्थानिक स्तरावरील खेळाडूंना निवडीची अनिश्चितता, मर्यादित संधी आणि आर्थिक अस्थिरता यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT