पुढारी ऑनलाईन
प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. भार्गवी नारायण दीर्घकाळ आजारी होत्या.
भार्गवी यांच्या नातीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्यांचा मुलगा प्रकाश यांनी सांगितलं की, त्यांच्या इच्छेनुसार पार्थिव सेंट जॉन्स रुग्णालयाला दान करण्यात येईल. त्य़ांचे डोळे नेत्रधाम संस्थानला दान केले जातील. भार्गवी यांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. यामध्ये एराडु कानासु, हंथकाना सांचू, पल्लवी अनुपल्लवी , वंशवृक्ष यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
टीव्हीची लोकप्रिय मालिका मुक्तामध्ये त्यांनी काम केलं आहे. यातील त्यांचा अभिनय दमदार होता. या मालिकेतील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. भार्गवी यांनी ६०० हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे.
भार्गवी शेवटच्या २०१२ मध्ये मोठ्या पडद्यावर दिसल्या होत्या. ना कांडा नम्मावरु ( Naa Kanda Nammavaru) हे त्यांचे पुस्तक समीक्षकांच्या पसंतीस उतरले हाेते. त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचलं का?