पुणे : रस्ते दुरुस्तीची डेडलाइन पुन्हा एकदा हुकणार | पुढारी

पुणे : रस्ते दुरुस्तीची डेडलाइन पुन्हा एकदा हुकणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांची पाणी आणि ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आलेले रस्ते 20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ववत करण्याची डेडलाइन पुन्हा एकदा हुकणार आहे. शिवाजी रस्त्यावरील कामे अद्यापही सुरू असल्याने सर्व रस्ते पूर्ववत होण्यास मार्च महिना उजाडेल, असे पथ विभागाच्या अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘दुपारनंतर राऊत सगळे चॅनल टेकओव्हर करतील!’

शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर आणि केळकर रस्त्यावरील 50 वर्षे जुन्या ड्रेनेजलाइन बदलण्याचे काम सुरू आहे. तसेच समान पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याचेही काम गेल्या सात महिन्यांपासून सुरू आहे. या कामांसाठी केलेल्या खोदाईमुळे खड्डे आणि खाच-खळग्यांच्या रस्त्यांवरून सध्या वाहतूक सुरू असल्याने गती मंदावली आहे. यातील बहुसंख्य रस्त्यावरील कामे पूर्ण झाल्याने काही रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्थायी समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक हेमंत रासने यांनी प्रशासनाच्या विविध विभागांचा सातत्याने आढावा घेत 10 जानेवारीपर्यंत मध्यवर्ती भागातील सहा प्रमुख रस्त्यांवरील खोदाईची कामे पूर्ण करून 20 जानेवारीपर्यंत डांबरीकरण करण्याची डेडलाइन दिली होती. मात्र, कामे पूर्ण करण्याची डेडलाइन उलटून शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर काही ठिकाणी खोदाई सुरू होती. त्यामुळे सर्व कामे पूर्ण करून रस्ते पूर्ववत करण्याची नव्याने 20 फेब्रुवारी डेडलाइन देण्यात आली.

पुणे : शिक्रापूरला आढळली गोरखमुंडीची नवी प्रजाती

लक्ष्मी रस्ता आणि केळकर रस्त्यावरील पथ विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्त्यावरील पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्मार्ट सिटी विभागाची कामे, दहा दिवसांत पथ विभागाची डांबरीकरणाची कामे पूर्ण होतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र, शिवाजी रस्त्यावर व इतर काही रस्त्यांवरील कामे अद्याप संपलेली नाहीत. ही कामे 20 फेब—ुवारीपर्यंत पूर्ण होणे अशक्य असून, कामे पूर्ण करून रस्ते पूर्ववत होण्यास मार्च महिना उजाडणार असल्याचे पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

हेही वाचा

नाशिकमधून शेकडो शिवसैनिक मुंबईकडे रवाना ; राऊतांच्या पाठबळासाठी शक्तीप्रदर्शन

गुजराती उद्योगपतीकडून देशाच्या इतिहासात सर्वांत मोठा बँक घोटाळा; CBI आणि SBI वर प्रश्नचिन्ह !

चारा घोटाळ्यातील पाचव्या केसमध्ये लालू प्रसाद यादव दोषी

Back to top button