मनोरंजन

‘सिटाडेल’ च्या सेटवर प्रियांका चोप्रा ‘जखमी’!

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : प्रियांका चोप्रा तिच्या आगामी हॉलीवूड वेब सीरिज 'सिटाडेल'च्या शूटिंगवेळी सेटवर 'जखमी' झाली. याबाबतची माहिती खुद्द प्रियांकानेच सोशल मीडियातून दिली आहे. पोस्टमध्ये तिने सेटवरील आपला एक फोटो शेअर केला. त्यामध्ये तिच्या चेहर्‍यावरील 'जखमा' दिसून येतात. कॅप्शनमध्ये तिने लिहिले, तुमचाही कामाचा 'टफ-डे' होता का? अर्थात ही जखम खरोखरची नसून तिच्या एका अ‍ॅक्शन सीनवेळी केलेल्या मेकअपचा हा भाग आहे.

प्रियांका यावर्षीच्या सुरुवातीपासूनच लंडनमध्ये 'सिटाडेल'चे शूटिंग करीत आहे. त्यामध्ये तिने एका गुप्‍तहेराची भूमिका साकारली आहे. 'सिटाडेल'पूर्वी तिने आपला आंतरराष्ट्रीय चित्रपट 'टेक्स्ट फॉर यू'चे शूटिंग पूर्ण केले होते. तिच्या आगामी हॉलीवूडपटांमध्ये 'मॅट्रिक्स 4', 'इटस् ऑल कमिंग बॅक टू मी' आणि 'एंडिंग थिंग्ज'चा समावेश आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT