मनोरंजन

सर्वाधिक महागडी गाणी !

अनुराधा कोरवी

सिनेमाच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांची खर्च केला जातो. त्यातही एखादा सीन अथवा गाण्यासाठीही कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाते. बॉलीवूडमध्ये अनेक गाण्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे दिसून येते. त्यातील काही गाणी..!

तेरी झलक

पुष्पा या सिनेमातील 'तेरी झलक अशर्फी श्रीवल्ली' या गाण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना योग्य चित्रित केलेले हे गाणे खूपच लोकप्रिय ठरले.

जिंदा बंद

अभिनेता शाहरूख खान याच्या जवान या चित्रपटातील 'जिंदा बंदा' या गाण्याच्या चित्रिकरणासाठी १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे

तू ही रे..

'तू ही रे..' हे गाणे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांच्या २. ० या सिनेमातील असून, चित्रिकरणासाठी आतापर्यंत सर्वाधिक सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले.

मलंग

धूम- ३ चित्रपटातील 'मलंग' या गाण्यासाठी ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे गाणे अभिनेता आमीर खान आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांच्यावर चित्रित करण्यात आले.

डोला रे डोला

डोला रे डोला' हे गाणे देवदास या सिनेमातील असून, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय- यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यासाठी निर्मात्यांनी २.५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

राम चाहे.. लिला चाहे

'गोलिओं की रासलिला' या सिनेमातील 'राम चाहे लिला चाहे' हे गाणे अभिनेत्री प्रियांका चोप्रावर चित्रित करण्यात आले. या गाण्यासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले.

अजीम ओ शान

जोधा अकबर या सिनेमातील 'अजीम ओ शान शहंशाह' या गाण्यासाठी २.५ कोटी रुपये खर्च आले. हे गाणे ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉय यांच्यावर चित्रित करण्यात आले.

छम्मक छल्लो..!

'उम्मक छल्लो' या रावण सिनेमातील गाण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या गाण्यावर अभिनेत्री करिना कपूर हिने डान्स करून लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT