पुढारी ऑनलाईन : अभिनेता फरदीन खान आता तब्बल बारा वर्षांनंतर पुनरागमन करीत आहे. तो लवकरच 'विस्फोट' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो त्याच्या सर्वात लोकप्रिय फ—ँचायझी 'नो एन्ट्री-2' मध्येही दिसणार आहे.
फरदीनने एका मुलाखतीत सांगितले, बारा वर्षांनंतर पुनरागमन करीत असताना उत्तेजित होण्यापेक्षा मी अस्वस्थ अधिक होतो. इतक्या वर्षांनंतर कॅमेर्यासमोर येत असताना माझी अवस्था नवोदित कलाकारासारखीच झाली होती. मी घाबरलो होतो आणि भावूकही झालो होतो. आता मात्र बॉलिवूड कधीही सोडणार नाही, हे मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो. मुलांच्या संगोपनात इतकी वर्षे कशी गेली हे कळलेच नाही. दरम्यान माझे वजनही वाढले होते. गेल्या सहा महिन्यात मी सकस आहार आणि व्यायामाने 18 किलो वजन घटवले!
हेही वाचलंत का?