ती परत आलीये नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच  
मनोरंजन

ती परत आलीये नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ती परत आलीये नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येत आहे. झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आणि प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

अधिक वाचा – 

त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय ती परत आलीये ही मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नुकतेचं या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. विजय कदम हे बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन करणार आहेत.

अधिक वाचा – 

प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये हत्या होते. त्यामुळे सावध राहा, अशी चेतावनी देताना दिसत आहेत.

नक्की ही भानगड काय आहे? या मालिकेत अजून कोण कलाकार असणार आहेत? ही सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे.

अधिक वाचा – 

या मालिकेचं लेखन देवमाणूस या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंकाच नाही.

विजय कदम म्हणाले…

विजय कदम म्हणाले, या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का?

ती परत आलीये म्हणजे नक्की कोण? या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळतील.

एका रहस्यमय मालिकेत काम करताना मी खूप उत्सुक आहे.

माझी भूमिका नक्की काय आहे हे सगळ्यांना लवकरच कळेल. प्रेक्षक या भूमिकेवर प्रेम करतील अशी माझी खात्री आहे.

अधिक वाचा –

पाहा व्हिडिओ – 200 वर्षे जुने बंगले असणारं मुंबईतलं म्हातारपाखाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT