मनोरंजन

तारा सुतारिया-अहान शेट्टी यांचा ‘तडप’ यादिवशी भेटीला

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तारा सुतारिया-अहान शेट्टी यांचा तडप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. तारा सुतारिया-अहान शेट्टी अभिनीत साजिद नाडियाडवाला यांचा 'तडप – अँन इनक्रेडिबल लव स्टोरी' ३ डिसेंबर, २०२ ला सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. यामध्ये तारा ही अहानसोबत दिसणार आहे. ३ डिसेंबर, २०२१ ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

अहान शेट्टीचे हे बॉलीवूड पदार्पण एका वारशाला पुढे घेऊन जाणारे आहे. कारण, सुनील शेट्टीला देखील याच निर्मात्यांद्वारा लॉन्च करण्यात आले होते.

अहान आणि तारा एका नव्या फ्रेश जोडी दिसमार आहे. सर्वात रोमांचक पद्धतीने समोर येणारी प्रेम कहाणी असणार आहे. प्रेक्षकांसाठी निश्चितपणे एक छानशी ट्रीट असेल.

'तडप'मधील अहानच्या फर्स्ट लुकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक नवा चेहरा पाहण्यासाठी सगळे उत्साहित आहेत.

चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली. नाडियाडवाला ग्रँडसनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले, "POST TO BE ADDED."

'तडप' मिलन लूथरिया दिग्दर्शित चित्रपट आहे. अहान, तारासोबत सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे निर्माण साजिद नाडियाडवाला यांच्याद्वारे करण्यात आले आहे. फॉक्स स्टार स्टूडियोद्वारा सह-निर्मित आहे. चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली आहेत. प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT