मनोरंजन

‘गणपत’ फेम क्रिती सेनॉन हिची Koo वर एंट्री

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आगामी चित्रपट 'गणपत' फेम अभिनेत्री क्रिती सेनॉन नुकतीच मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू शी जोडली गेली आहे. कू वर येताच क्रिती सेनॉन हिला केवळ एका आठवड्यात २० हजारांहून अधिक फॉलोवर्स मिळाले आहेत.

अधिक वाचा-

क्रिती सेनॉन

आठवड्यात २० हजार फॉलोअर्स

अॅपवर आल्यानंतर फक्त एकाच आठवड्यात तिला जवळजवळ २० हजार फॉलोअर्स मिळाले. @kritisanon या हँडलचा वापर करून, बॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्रीने आता कू प्लॅटफॉर्मवर तिची उपस्थिती दृढपणे स्थापित केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी, टायगर श्रॉफने देखील कू वर एंट्री घेतली आहे.

अधिक वाचा-

क्रिती कू शी जोडली जाताच तिच्या चार फॅनक्लबने कू वर त्यांचे हँडल तयार केले आहेत. @FAN_OF_KS, @Kriti_Sanon_FC, @kritsaffection, @team_kritian.

अधिक वाचा-

तिने तिच्या डोळ्यांचा एक उत्स्फूर्त फोटोग्राफ शेअर केला आहे. कू वरील तिच्या उपस्थितीबद्दल इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तिच्या चाहत्यांना सांगितले.

अगदी अलीकडेच, अभिनेत्रीच्या एका सुंदर छायाचित्राला १,७०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले. ती तिच्या चाहत्यांशी अनेक भाषांमध्ये जोडण्यासाठी कू चा वापर करेल.

क्रिती सेनॉन

ती इंडस्ट्रीतील तरुण कलाकारांपैकी एक आहे. जी दिवसेंदिवस अधिक लोकप्रियता मिळवत आहे. तिच्या प्रोजेक्ट्स आणि स्क्रिप्ट्सद्वारे लोकांना आकर्षित करत आहे. तिने अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे मिम्मी चित्रपट हा सुपरहिट केला आहे.

मिमीच्या पटकथेने आणि तिच्या अभिनयाने समीक्षकांकडून प्रशंसा मिळवली. सेनॉन सध्या प्रभास व सनी सिंग यांच्यासोबत काम करत आहे. ते आदिपुरुष या चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे.

हेदेखील वाचा-

क्रिती सेनॉनचा राजेशाही लूक

क्रितीने सोशल मीडियावर तिचे काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा रॉयल लूक दिसत आहे. शाही लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. राजेशाही अंदाजातील तिच्या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून कमेंट्स मिळत आहेत. सोशल मीडियावर तिचे हे फोटोज तुम्ही पाहू शकता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT