मनोरंजन

आयुष शर्मा याच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपट पोस्टरचे अनावरण

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'अंतिम: द फायनल ट्रुथ' च्या पहिल्या पोस्टरचे अनावरण आज करण्यात आले. या चित्रपटातून चाहत्यांना असलेल्या अपेक्षांची झलक या पोस्टरद्वारे मिळते आहे. सलमान-आयुष शर्मा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून रोखून बघत आहेत. लव्हरात्रीनंतर आयुष शर्मा या नव्या चित्रपटात दिसणार आहे.

पोस्टरचे डिझाईन इंटेंस आहे. पोस्टरमध्ये दोन प्रमुख पुरुषांमधला एक महाकाय संघर्ष यातून दिसतो आहे. चित्रपट 'अंतिम'चे कथानक पोलीस, गँगस्टर यांच्या आसपास फिरते.

Antim

दोन नायक असलेला हा चित्रपट आहे. 'अंतिम' पूर्णपणे दोन वेगवेगेळी विश्व आणि विचारधारांच्या दोन नायकांमधील संघर्षाला समोरा-समोर आणते. ज्यातून एक भयकंपित आणि अंगावर काटा आणणारा भयानक अंत पहायला मिळतो.

ही पहिलीच वेळ आहे जेव्हा, सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांसोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत.

सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत, 'अंतिम' सलमा खान द्वारा निर्मित आणि महेश मांजरेकर यांच्याद्वारे दिग्दर्शित आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT