मनोरंजन

अर्जुनऐवजी मलायकाबरोबर ‘हा’ कोण?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरबरोबर दिसू लागली. दोघांनी खुलेआम आपले नाते स्वीकारलेले आहे. आता हे दोघे लग्न कधी करतात, इतकाच प्रश्न आहे. ही जोडी सतत एकमेकांसमवेत दिसत असते. मात्र, आता मलायकाच चक्‍क शिव ठाकरे याच्यासमवेत दिसून आली.

'बिग बॉस मराठी' या शोमधील लोकप्रिय स्पर्धकांपैकी हा एक. शिवा हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो. नुकताच त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो मलायकासमवेत दिसून आला. त्यांचा हा रोमँटिक व्हिडीओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

दोघांनी 'ओम शांती ओम' चित्रपटातील 'आँखो में तेरी अजबसी' या गाण्यावर हा व्हिडीओ बनवला आहे. आता हा व्हिडीओ पाहून मलायका मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे का, असेही बोलले जात आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT