Zubeen Garg death case Manager and Singapore event organizer arrested
मुंबई - गायक जुबीन गर्गच्या मृत्यूनंतर नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक श्यामकानु महंत आणि मॅनेजर सिद्धार्थ शर्माला अटक करण्यात आलीय. सिंगापूरमध्ये त्यांनी जुबीन गर्ग यांना सोबत नेले होते.
नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल (NEIF) साठी आसामचे लोकप्रिय गायक जुबीन गर्ग सिंगापूर येथे गेले होते. त्याठिकाणी स्कूबा डायव्हिंग करताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक श्यामकानु महंत आणि जुबीन गर्ग यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांच्या अटकेची मागणी होत होती. पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसरा, श्यामकानु महंत सिंगापूरहून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले, त्यांना तिथेच अटक करण्यात आली. दुसरीकडे सिद्धार्थ शर्माला हरियाणातील गुरुग्राम येथील एका अपार्टमेंटमधून पकडण्यात आले. दोघांनाही बुधवारी सकाळी आसामची राजधानी गुवाहाटी येथे आणण्यात आले.
मीडिया रिपोर्टनुसार, जुबीन गर्ग यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृत्यू रहस्य बनले आहे. सिंगापूर येथील आसाम असोसिएशनचे सदस्य, आयोजन समिती आणि फेस्टिव्हलमध्ये सहभागी अन्य लोकांचाही तपास केला जात आहे. एसआयटीने महंत, शर्मा आणि सिंगापूर गेलेल्या अनेय स्पर्धकांना नोटिस पाठवून चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. पण, महंत आणि शर्मा यांच्याकडून सहकार्य न मिळाल्याने पोलिसांना ही कारवाई करावी लागली.
याआधी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी देखील म्हटलं होतं की, महंत - शर्मा यांच्या विरोधात इंटरपोलच्या मदतीने ‘लुकआउट नोटिस’ जारी केलं गेलं आहे. त्यांना ६ ऑक्टोबर रोजी उपस्थित होण्याचे निर्देश देण्यात आले होते. पुढील काही दिवसांत चौकशीमधून काय सत्य समोर येणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.