Zaira Wasim Slams JK Waqf Board: जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाकडून आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या एका कार्यक्रमकात मुलींना काश्मिरी गीतावर नाचताना पाहिल्यानंतर दंगल फेम झायरा वसीम चांगलीच भडकली. तिने भली मोठी सोशल मीडिया पोस्ट लिहून वक्फ बोर्डाला जाब विचारला आहे.
झायरा वसीमने कार्यक्रमात लहान मुलींचा वापर हा फक्त स्टेजची शोभा वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रॉप्ससारखी झाली आहे का असा सलाव विचारला. काही लोकांनी याला इस्लामिक मुल्यांचे उल्लंघन करणारे ठरवले आहे. ज्या संस्थेची स्थापना ही मुस्लीम मुल्यांची जपणूक करण्यासाठी झाली आहे तेच या मुल्यांचे उल्लंघन करत आहेत असं देखील झायरा म्हणाली.
वक्फ बोर्डाची प्रमुख आणि भाजप नेता दरख्शा अंद्राबी यांनी झायरा वसीमच्या या टीकेवर कोणती प्रतिक्रिया दिली नाही. वसीमने एक्सवर पोस्ट करत वक्फ बोर्ड ही एक धार्मिक संघटना नाहीये का? मुस्लीम समाजाची सेवा करण्याचा आणि इस्लामी मुल्यांचे संरक्षण करण्याच्या जबाबदारी त्यांची नाहीये का? असे प्रश्न विचारले.
पुढे जाऊन झायरा वसीमने वक्फ बोर्डावर टीका केली. ती म्हणाली की या संस्थेबाबत एक गोष्ट खूप हास्यास्पद वाटली. ही एक अशी संस्था आहे ज्याची पायाभरणी धार्मिक आणि सामुदायिक उद्येशावर झाली. मात्र अशा गोष्टी ही संघटना फार हलक्यात घेते.
झायरा म्हणाली की तुम्ही तुमचे नाव अशा आयोजनाशी जोडता जिथं आपल्या मुलींना स्टेजवर फक्त एक प्रॉप्स आणि कलाकार इथपतच मर्यादित ठेवलं जात. मुलींना सार्वजनिक कार्यक्रमात सामील करण्यासाठी त्यांना संबंध नसलेल्या गीतांवर नाचवणे ही सामान्य पद्धत का आहे? आपली संघटना त्यांना विचार करण्यासाठी, काहीतरी नवीन करण्यासाठी, शिकण्यासाठी, चर्चा करण्यासाठी किंवा कोणत्यातरी सार्थक कामात योगदान देण्याची संधी का नाही देत?