Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Pudhari
मनोरंजन

Dhanashree Verma: युजवेंद्र चहलची ती कृती अन् धनश्री वर्माने घेतला नाते संपवण्याचा निर्णय; घटस्फोटाबाबत धक्कादायक माहिती

आरोपांमध्ये जास्त करून धनश्रीलाच दोषी ठरवले गेले होते

अमृता चौगुले

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorceअलीकडच्या काळातील चर्चेतील प्रकरण म्हणजे युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट. सोशल मिडियावर सतत अॅक्टिव असलेल्या या जोडीचा विभक्त होण्याचा निर्णय त्या दोघांच्याही फॅन्सनाही फारसा पचनी पडला नाही. या दोघांच्या घटस्फोटादरम्यान सोशल मिडियावर त्यांच्या फॅन्सनी बरेच आरोप प्रत्यारोप केले होते. त्यातील आरोपांमध्ये जास्त करून धनश्रीलाच दोषी ठरवले गेले होते. (Latest Entertainment News)

एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या नात्याबाबत, घटस्फोटाबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखातीमध्ये युजवेंद्रने सांगितले होते की ही जोडी अनेकदा आपल्या नात्याबाबत दिखावा करत होती. धनश्रीने याबाबतही वक्तव्य केले आहे.

धनश्री याबाबत म्हणते, ‘ प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. ज्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजत नाही त्याप्रमाणे एकच बाजू खरी असू शकत नाही. या घटनेची माझी एक बाजू आहेच की मला त्याबाबत बोलायचे आहे का? नाही. मला आता माझ्यावर काम करायचे आहे.

हे सगळे आता घडून गेले आहे. आता यातून पुढे जाऊया. लोकाना हे समजायला हवे की तुम्ही कायम एखाद्या महिलेवर दोषारोप करू शकत नाही. जेव्हा तुम्हाला माहिती नसेल काहीतर तुम्ही एखाद्यावर कसे दोषारोप करू शकता. लोकांना सुरुवातीपासूनच तुमच्याविषयी तक्रार असते.

युजवेंद्रचा टी शर्ट ठरला कारणीभूत

धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाची केस कोर्टात सुरू असताना घडलेल्या एका घटनेने सोशल मिडियावर चांगलीच हवा केली होती. कोर्टातून बाहेर येताना युजवेंद्रने घातलेल्या टी शर्टवर सगळ्यांचे लक्ष वेधले. ज्यावर मेसेज लिहिले होते, स्वत:चे शुगर डॅडी स्वत: बना. याचा संबंध अर्थातच धनश्रीने मागितलेल्या पोटगीशी होता हे वेगळे सांगायची गरजही नव्हती.

धनश्री म्हणते, ‘तो कोर्टातून बाहेर आला. त्यावेळी त्याच्या टी शर्टवर तो मेसेज लिहिला होता. मी कोर्टातून मागच्या दराने बाहेर आले आणि मोबाईलवर त्या टी शर्टबाबत चर्चा ऐकली. 'याने खरंच असे केले आहे? माझ्या मनात हाच विचार आला. मला वाटले मी हे कुणासाठी करते आहे. मी कुणासाठी रडते आहे. हीच गोष्ट मला या घटनेतून बाहेर पडायला मदत करणारी ठरली.’

या प्रकरणानंतर काही दिवसांतच धनश्रीने एक नवे गाणे रिलीज केले होते. जे घरगुती हिंसाचार आणि फसवणुकीवर बेतले होते. यातून तिने तिच्या लग्नाच्या नात्याचे सत्य समोर आणल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT